आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोनाचा घातक वेग:रोज आढळणारे कोरोना रुग्ण महिनाभरात झाले दुप्पट, मृत्यूही 32% पर्यंत वाढले; सावरलो नाही तर मार्चअखेरपर्यंत रोज 50 हजार रुग्णवाढीचा धोका

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम मोदी उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, अहमदाबादेत उर्वरित तीन टी-२० प्रेक्षकांविनाच

कोरोना मंदावताच लोक बेपर्वाईने राहू लागले होते. मात्र ही चूक आता अंगाशी आली आहे. मार्चच्या सुरुवातीपासून कोरोना सातत्याने रौद्ररूप दाखवत आहे. गेल्या महिन्यात देशात एका आठवड्यात सरासरी ११,२०० नवे रुग्ण आढळत होते. आता हा आकडा २२,२७७ वर पाेहोचला आहे. म्हणजे महिनाभरात देशात दुप्पट रुग्ण आढळू लागले आहेत. फेब्रुवारीत एका आठवड्यात सरासरी ९४ मृत्यू होत होते. ते आता १२४ वर गेले आहेत. म्हणजे मृत्यूही ३२% वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २६,२९१ नवे रुग्ण, तर ११८ मृत्यू झाले. रुग्णवाढीचा हा यंदाचा सर्वात मोठा आकडा आहे. गेल्या तीन महिन्यांत सातव्यांदा रोजचे रुग्ण २० हजारांनी वाढले आहेत. यापूर्वी २० डिसेंबरला २६,६२४ रुग्ण सापडले होते.

टी-२० सामने प्रेक्षकांविना : अहमदाबादेत भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन टी-२० सामने आता प्रेक्षकांविनाच खेळवले जातील. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी काेरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत बुधवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांशी व्हिसीद्वारे चर्चा करणार आहेत.

लसीकरण मंदगतीने, यामुळे खूप वर्षे लागतील : संसदीय समिती
सर्वाधिक लसी टोचण्यात भारत जगात चौथ्या स्थानी आहे. मात्र आतापर्यंत देशाच्या केवळ १% लोकसंख्येलाच लस मिळाली आहे. या मंदगतीवर गृह मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने सरकारला खडसावले आहे. संसदेत सोमवारी सादर अहवालात म्हटले आहे की, १८ फेब्रुवारीपर्यंत ९८.४६ लाख लोकांना लस मिळाली. या वेगाने संपूर्ण लोकसंख्येपर्यंत लस पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागतील. समितीने कोविड-१९ चे नवे स्ट्रेन मिळत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामुळे दुसरा डोस न घेणे हा गंभीर मुद्दा आहे. लोक लस घेण्यास कचरत असल्याने लसीकरण मंदावले आहे. यामुळे विशेष अभियान डिझाइन केले आहे. त्यात २२ मंत्रालयांच्या फील्ड नेटवर्कद्वारे माहिती प्रसारित केली जात आहे. राज्यसभेतील काँग्रेस उपनेते आनंद शर्मा ३१ सदस्यांच्या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हेदेखील समितीचे सदस्य आहेत.

  • महाराष्ट्र आणि पंजाब वगळता नवे रुग्ण वाढलेल्या राज्यांत रोजचे मृत्यू वाढलेले नाहीत. केरळात रोज आढळणारे रुग्ण ६१% पर्यंत घटले, मात्र राेजचे मृत्यू कमी झालेले नाहीत.
  • महाराष्ट्रानंतर दुसरे सर्वाधिक संक्रमित राज्य केरळात (१०.९१ लाख) स्थिती सुधारत आहे. तेथे एका महिन्यात रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ४,६१२ वरून १,७९२ वर आली आहे. म्हणजे ६१% घटली आहे. ते वेगळता एकाही मोठ्या राज्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या घटलेली नाही.

देशात महिनाभरापूर्वी रोज ९ हजार नवे रुग्ण येत होते. यानंतरच्या प्रत्येक दिवशी २ ते ३ हजार रुग्ण वाढू लागले. तीन महिन्यांत ७ वेळा २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले.

युरोपात तिसरी लाट, पुन्हा ‘लॉकडाऊन’चा सल्ला
युरोपात कोरोना पुन्हा वेगाने वाढला आहे. जर्मनीत आयसीयूच्या डॉक्टर्सनी म्हटले की, तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी तत्काळ लॉकडाऊन लावले पाहिजे. तसेच इटली, फ्रान्स व पोलंडमध्येही नवे रुग्ण वाढू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...