आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:नवीन स्ट्रेनने संक्रमित लोकांचा आकडा 200च्या पुढे; महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात 250 टक्के नवीन रुग्ण वाढले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आतापर्यंत कोरोनाचा नवीन स्ट्रेन असलेले 240 रुग्ण आढळून आले आहेत. हा नवीन स्ट्रेन अत्यंत धोकादायक आणि झपाट्याने पसरणारा आहे. UK, ब्राझील आणि अमेरिकेचे या स्ट्रेनमुळे आणखी संकट वाढले आहे. या नवीन स्ट्रेनने संक्रमित आता असेही लोक आढळून येत आहेत ज्यांची विदेशात जाण्याची कोणतिही हिस्ट्री नाही. या दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. एक दिवसातच संक्रमण 250 टक्क्यांनी वाढले आहे. शुक्रवारी राज्यात 10,216 नव्या काेरोना रुग्णांची नोंद झाली. पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच, एकाच दिवशी 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 17 ऑक्टोबरला 10,259 लोक पॉझिटिव्ह आढळून आले होते.

राज्य आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, मागील 24 तासात 6,467 लोक रिकव्हर झाले असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. आतपर्यंत राज्यात 21 लाख 98 हजार 399 लोक संक्रमित झाले असून यामधील 20 लाख 55 हजार 951 लोक बरे झाले आहेत. 52 हजार 393 रुग्णांचा मृत्यू झाला असून 88 हजार 838 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...