आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:आयुर्वेदिक अँटिबायोटिकने सहा दिवसांत रुग्ण निगेटिव्ह, दिल्लीतील अ. भा. आयुर्वेद संस्थेत विशेष संशोधन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदाच्या चार औषधींमुळे कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार शक्य आहे. आयुष मंत्रालयाच्या दिल्लीतील अ. भा. आयुर्वेद संस्थेच्या केस स्टडीत हा दावा करण्यात आला आहे.

आयु केअर जर्नलमध्ये प्रसिद्ध संशोधनात म्हटले आहे की, आयुष क्वाथ, संशमनी वटी, फीफाट्रोल आणि लक्ष्मीविलास रस या औषधांनी हे उपचार करण्यात आले. ३० वर्षांच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला संस्थेत दाखल करण्यात आले. संस्थेतील डॉ. शिशिरकुमार मंडल यांच्या नेतृत्वात उपचार सुरू करण्यात आला. रुग्णाला तीन वेळा १० मिलिलीटर आयुष क्वाथ, दोन वेळा २५० मिलिग्रॅम संशमनी वटी आणि लक्ष्मीविलास रस देण्यात आला. तसेच फीफाट्रोलच्या ५०० मिली ग्रॅमची गोळी दोन वेळा देण्यात आली. सहाव्या दिवशी रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली. फीफाट्रोल सुदर्शन घन वटी, संजीवनी वटी, गोमंती भस्म, त्रिभुवन कीर्ती रस तथा मृत्युंजय रसापासून तयार करण्यात येते. तर तुळशी, कुटकी, चिरायता, गुडुची, दारुहरिद्रा, अपामार्ग, करंज व मोथाचे अंशही त्यात आहेत. आयुष क्वाथ दालचिनी, तुळशी, काळी मिरी व सुंठीचे मिश्रण आहे. संशमनी वटी गुळवेलीच्या सालीपासून तयार केली आहे.