आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:24 तासात 43,504 नवीन रुग्ण आढळून आले तर 44,204 बरे झाले, 908 रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्र-केरळातील आकड्यांनी वाढवली चिंता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट दिसून आली आहे. मागील 24 तासात 43,504 नवीन रुग्ण आढळून आले तर 44,204 बरे झाले असून या महामारीत 908 रुग्णांनी आपला जीव गमावला. या दरम्यान सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्र (9,083) आणि केरळ (13,772 )मध्ये आढळून आले. या दोन्ही राज्यात सध्या सर्वात जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी देशात आढळून आलेल्या एकूण कोरोना प्रकरणांमध्ये 53% रुग्ण याच राज्यातील आहेत.

गुरुवारी, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,625 ने कमी झाली आहे. एक दिवसापूर्वीच यामध्ये 336 ने वाढ झाली होती. गेल्या 105 दिवसांत प्रथमच ऍक्टिव्ह रुग्ण वाढले होते. यापूर्वी 12 मे रोजी यामध्ये 6,399 ची वाढ झाली होती.

देशात कोरोना महमरीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण रुग्ण : 43,504
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 44,204
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 908
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.07 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.98 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.05 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.53 लाख
बातम्या आणखी आहेत...