आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड-19:देशात कोरोना रुग्ण 2 लाखांच्या पुढे; अद्याप उच्चांकी पातळी नाही : सरकार, 2.94 टक्के रुग्ण सध्या आयसीयू

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 लाख पूर्ण बरे झाले : 8,147 नव्या रुग्णांसह आता देशात 2,00,321 रुग्ण

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला. केवळ १५ दिवसांत रुग्णसंख्या १ लाखावरून २ लाखांवर गेली. मंगळवारी ८,१४७ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ३२१ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबळींचा आकडा ५,७३९ वर गेला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशात काेरोनाचा संसर्ग अद्याप सर्वाेच्च पातळीवर नाही. संसर्ग रोखण्यासाठी उचललेली पावले ख्ूपच फायदेशीर ठरली आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती आहे. जगभरात भारतासह अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन व इटलीतच दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तथापि, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, फक्त रुग्णसंख्येकडे बघून भारत जगातील ७ सर्वाधिक रुग्णसंख्येच्या देशात आहे, असे म्हणणे चूक आहे. अशी तुलना करताना देशांच्या लोकसंख्येकडेही पाहिले पाहिजे. भारताइतकी एकत्रित लोकसंख्या असलेल्या १४ देशांत भारताच्या तुलनेत ५५.२ पट जास्त मृत्यू झाले आहेत. ते म्हणाले, भारतात मृत्यूदर २.८२%, तर जगभरात ६.१३% आहे. प्रति लाख लाेकसंख्येमागे मृत्यूदर ०.४१% आहे, तर जगात तो यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे ४.९% आहे. दिल्लीत १ दिवसात सर्वाधिक १,२९८ रुग्ण आढळले आहेत.

खाटा : कोविड रुग्णालयांत १ लाख ५८,९०८ खाटा राखीव

देशभरातील ९४२ विशेष काेविड रुग्णालयांत १ लाख ५८,९०८ बेड्स आहेत. २०,६०८ आयसीयू बेड व ६९,३८४ ऑक्सिजन सपोर्टचे बेड आहेत. २,३८० विशेष कोविड आरोग्य केंद्रांत १ लाख ३३,६७८ बेड्स आहेत. पैकी १०,९१६ आयसीयू व ४५,७५० ऑक्सिजन सपोर्टयुक्त बेड्स आहेत. ७,३०४ कोविड केअर सेंटर व १०,५४१ क्वॉरंटाइन सेंटर आहेत. तेथे ६ लाख ६४,३३० बेड्स आहेत.

पीपीई : एक कोटीपेक्षा जास्त पीपीई किट्स मिळाले आहेत

रुग्णसंख्या वाढत असताना किमान २ कोटी १ लाख पीपीई किट्सची गरज पडेल, असा अंदाज त्या वेळी होता. तेव्हा २.२२ कोटी किट्सची आॅर्डर देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या ऑर्डरपैकी १ कोटीपेक्षा जास्त किट्स आल्या असून त्या राज्यांना पाठवल्या आहेत. २.७२ कोटी एन-९५ मास्कच्या आवश्यकतेचा अंदाज होता. २.४९ काेटी मास्कची आॅर्डर दिली, पैकी १.२० कोटी मास्क आले आहेत.

व्हेंटिलेटर : ६० हजारांची ऑर्डर दिली, अडीच हजारच मिळाले

देशात व्हेंटिलेटरची मागणी ७५ हजारांवर जाण्याचा प्राथमिक अंदाज होता. रुग्णालयांतील १९,३९८ व्हेंटिलेटर काेरोनाग्रस्तांसाठी राखीव केले. ६० हजार ८८४ व्हेंटिलेटरची आॅर्डर दिली, पैकी अडीच हजारच मिळाले आहेत. त्यातील १ हजार व्हेंटिलेटर रुग्णालयांना पाठवले आहेत. अधिकाऱ्यांनुसार, महिनाअखेरीस आणखी १५ हजार व्हेंटिलेटर मिळतील.

देशात शेवटचे ५० हजार रुग्ण सर्वािधक वेगाने वाढले

रुग्णांची संख्या  दिवस

0 ते 50 हजार - 95 दिवस

50 हजार ते 1 लाख-  13 दिवस

1 लाख ते दीड लाख - 9 दिवस

दीड लाख ते 2 लाख - 6 दिवस

- देशात कोरोनामुळे प्रत्येक दुसऱ्या मृत्यू ज्येष्ठ नागरिकाचा होत आहे. हे प्रमाण लाेकसंख्येच्या १०% आहे.

- कोरोनाबळींपैकी ७३% रुग्ण आधीच कोणत्या न कोणत्या गंभीर आजाराने ग्रस्त होते.

देशात २.९४ टक्के रुग्ण सध्या आयसीयू, तितकेच व्हेंटिलेटरवर

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी २.९४% आयसीयू व इतकेच ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. फक्त ०.४५% रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत २९०० रुग्ण आयसीयूत तर तितकेच ऑक्सिजन सपोर्टवर होते. ४५० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डाॅ. व्ही.के. पॉल म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात जितके रुग्ण व्हेंटिलेटरवर जाण्याचा अंदाज होता, तशी स्थिती आता नाही.

औषधे : साडेअकरा कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या राज्यांना

गंभीर रुग्णांना प्रामुख्याने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व अॅझिथ्रोमायसिन ही औषधे सध्या दिली जात आहेत. एचसीक्यूच्या तब्बल ११.४५ कोटी गोळ्यांची ऑर्डर दिली होती, ती पूर्ण आली आहे. २५ लाख अॅझिथ्रोमायसिन गोळ्याही आता मिळाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...