आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Patients Treated As Untouchables Once Posters Pasted On Their Homes, Says Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना रुग्णांचे प्रकरण:सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावल्यानंतर त्यांच्याशी अस्पृश्याची वागणूक दिली जाते

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'हा नियम नाही, तर दुसऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था'

कोरोना संक्रमितांच्या घराबाहेर पोस्टर लावण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने म्हटले की, कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावल्यानंतर त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते.

सरकारचे उत्तर- हा नियम नाही, तर दुसऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था

केंद्र सरकारने कोर्टात म्हटले की, पोस्टर लावणे हा महत्वाचा नियम नाही. याचा उद्देश कोरोना रुग्णांची बदनामी करण्याचा नाही, तर दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी आहे. सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी म्हटले की, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी काही राज्ये हा मार्ग अवलंबत आहेत.तर, सरकारकडून जस्टिस अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एम आर शाह यांच्या बेंचने म्हटले की, वास्तव भिन्न आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होईल.

सुप्रीम कोर्टाने 5 नोव्हेंबरला केंद्र सरकारला म्हटले होते की, कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यासंबंधी नियमावली जारी करण्यावर विचार करावा. याप्रकरणी पिटीशनर कुश कालरांनी अपील केली होती. यावर कोर्टाने सरकारला नोटिस ने देता निर्देश दिले होते.

कोर्टाने केंद्राला विचारले- संपूर्ण देशासाठी एकच नियमावली का बनवत नाहीत ?

सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, दिल्ली सरकारने कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मग, केंद्राला संपूर्ण देशासाठी एकच नियमावली जारी करण्यात काय अडचण आहे ?

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser