आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Positivity Rate| Up In Kerala And Mizoram, Down In Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu; News And Live Updates

कोरोनाची तिसरी लाट येणार का?:केरळमध्ये एका महिन्यात पॉझिटिव्हिटी दरात 3% तर मिझोराममध्ये 2.7% ने वाढ, महाराष्ट्रात 1.4% ने कमी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय?

देशात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहे. त्याचबरोबर नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. वैज्ञानिकांच्या मते, देशात ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. परंतु, देशातील पॉझिटिव्हिटी रेट पाहिल्यास हे दिलासा देणारे आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार कोरोना नियमांत शिथिलता देण्याची तयारी करत आहे. परंतु, कोरोनाची तिसरी लाट येणार का? याबाबत वैज्ञानिक आणि संस्था या दोन्हीच्या दाव्यात मतभेद आहेत.

मे-ऑगस्टमध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 18.9% ने घट
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड हाहाकार माजवला होता. यामुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. परंतु, त्यानंतर देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात घट पाहायला मिळाली होती. देशात 1 मे ते 1 ऑगस्टदरम्यान पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 18.9 टक्क्यांनी घट झाली होती. दुसऱ्या लाटेपूर्वी 1 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान या दरात 5.7% ने वाढ झाली होती.

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय?
एका आठवड्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या 100 लोकांपैकी ज्या लोकांचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह येतो, त्यावरुन कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ठरवला जातो. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये कमी येणे हे कधीही चांगले मानले जाते.

10 राज्यात वाढला पॉझिटिव्हिटी रेट
देशात कोरोनाचे सर्वात जास्त प्रकरणे केरळ राज्यात येत आहे. गेल्या 24 तासात 20 हजारांपेक्षा कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात येत आहे. केरळनंतर महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त नवीन प्रकरणे समोर येत आहे. परंतु, या दोन्ही राज्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटची तुलना केल्यास केरळमध्ये वाढ झाली आहे तर महाराष्ट्रात यामध्ये घट पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे ज्या राज्यांत कोरोनाचे नवीन प्रकरणे सर्वात जास्त येत आहे. त्याच राज्यात कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत आहे. देशातील सर्वात जास्त 10 राज्यात कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्रख्, आंधप्रदेश, तामिळनाडू, मिझोरम, कर्नाटक आदी राज्यांतदेखील या दरात वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...