आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना उपचार:दिल्लीतील रुग्णालयात आयसाेलेशन बेडसाठी 10 हजार रुपये शुल्क

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसाेलेशन बेडचे शुल्क निम्म्याने हाेणार कमी

दिल्लीतील काेराेना रुग्णांसाठी आयसाेलेशन बेडसाठी राेज ८ हजार ते १० हजार रुपये शुल्क आकारण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने केली आहे. त्याचप्रमाणे बिगर व्हेंटिलेटरच्या आयसीयू बेडसाठी १३ ते १५ हजार आणि व्हेंटिलेटरच्या आयसीयू बेडसाठी १५ ते १८ हजार रुपये शुल्क निश्चित करण्याची शिफारस केली आहे. नीती आयाेगाचे सदस्य व्ही. के. पाॅल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात ६० टक्के कमी दरात बेड उपलब्ध करून देणे तसेच काेराेना तपासणी व उपचाराचे शुल्क निश्चित करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असल्याचे गृह मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती गंभीर : दिल्लीचे आराेग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती शुक्रवारी गंभीर झाली. त्यांना साकेतच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काेराेना पाॅझिटिव्ह असलेले जैन यांच्यावर प्लाझ्मा उपचार करण्यात येणार आहेत. त्याआधी आतड्यात संसर्ग वाढल्यानंतर त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले हाेते. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बातम्या आणखी आहेत...