आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona | School | Start | Neither Vaccines For Children Nor Booster Doses Rush To The Center; Maharashtra, However, Insisted, Permission To Start Classes 1 To 4

कोरोना संसर्गाचे नवे रुग्ण:ना मुलांसाठी लस ना बूस्टर डोसची केंद्राला घाई; महाराष्ट्र मात्र आग्रही, इयत्ता 1 ते 4 वर्ग सुरू करण्यास परवानगी

पवनकुमार | नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना संसर्गाचे नवे रुग्ण सातत्याने घटत आहेत, यामुळे...

केंद्र सरकार लहान मुलांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा देशात महिनाभरापासूनच सुरू आहे. सोबतच बूस्टर डोस देण्याचेही धोरण तयार होत आहे. मात्र, सध्या याबाबत कोणताही विचार सुरू नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकार तूर्त मुलांचे लसीकरण सुरू करण्याच्या घाईत नाही.

बूस्टर डोसबाबतही तत्काळ निर्णय होणार नाही. यामागे अनेक कारणे आहेत. काही प्रमुख कारणांचा उल्लेख करत वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, जगातील जवळपास सर्वच प्रमुख देशांनी बूस्टर डोस सुरू केलेले आहेत. मात्र भारतातील परिस्थिती सध्या वेगळी आहे. येथे सध्या अमेरिका-ब्रिटनप्रमाणे कोरोना संसर्ग वाढत नाही ना मुलांच्या संसर्गाबाबात जास्त धोका. दुसरीकडे, देशातील १८ कोटी प्राैढांनी अद्याप लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही. त्यांचे लसीकरण झाल्यानंतरच बूस्टर डोसचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

आधार डेटानुसार, देशात १८ वर्षांवरील ९५ कोटी लोक आहेत. यापैकी ७७ कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. लसीचा दुसराही डोस घेणाऱ्या लोकांचा आकडा सुमारे ४१ कोटी आहे. म्हणजे १८ लोटी लोकांनी अद्याप एकही डाेस घेतलेला नाही. सर्वात आधी त्यांना लस देण्यास सरकारचे प्राधान्य आहे. बूस्टर डोसचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे अद्याप कोणतेही सबळ कारण नाही.

मुलांचे लसीकरण, ज्येष्ठांना बूस्टर डोस द्या : मंत्री राजेश टोपे

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, मुलांच्या लसीकरणासह ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याचेही टोपेंनी सांगितले.

दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग भरवण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळे इयत्ता पाचवीपासून पुढील वर्ग अगोदरच उघडले असून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्यास शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे टोपे म्हणाले.

राज्यात १,७११ मुले कोरोनाबाधित

राज्यात ११ ते २० वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. राज्यभरात १ हजार ७११ मुले कोरोनाबाधित आढळून आली आहे. अलीकडच्या अवघ्या २० दिवसांतील ही आकडेवारी आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण तातडीने केले पाहिजे असे टास्क फोर्सचही मत आहे.

लसीकरणासाठी १५ डिसेंबरची डेडलाइन
राज्यात नोव्हेंबरअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त १५ डिसेंबरपर्यंत पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वासही टोपेंनी व्यक्त केला.

संसर्गाचा दर सध्या एक टक्क्याच्याही खाली, यामुळे लसीचा बूस्टर डोस देण्याची गरज नाही

भारतात कोरोना संसर्गाचा साप्ताहिक दर ०.९३% आहे. यामुळे बूस्टर डोस टाळला जात आहे. डब्ल्यूएचओनुसार, संसर्गाचा दर ५% पेक्षा कमी असल्यास महामारी नियंत्रणात असल्याचे मानले जाते. सर्वच प्रौढांना लस दिली तर मृत्यू कमी होतील. कारण ८०% पेक्षा जास्त कोरोना मृत्यू ४५ वर्षांवरील लोकांचे आहेत.

१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना कव्हर करण्यासाठी आणखी ७२ कोटी डोसची गरज सध्या दोन गटांवर भर आहे. पहिला- एकही डोस न घेतलेले १८ कोटी लोक. त्यांना ३६ डोस डोस लागतील. दुसरे- एकच डोस घेतलेले ३६ कोटी लोक. म्हणजे सर्वांसाठी आणखी ७२ कोटी डोसची गरज आहे. सध्या दरमहा २५ कोटींच्या आतच डोस दिले आहेत. यामुळे या लोकांना कव्हर करण्यासाठी ३ महिनेे लागतील. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले, लसीकरणात धार्मिक, सामाजिक व राजकीय संघटनांचीही मदत घेतली जात आहे.

  • बूस्टर डोस तूर्त का नाही? भारतात १८ कोटी प्रौढांना अद्याप पहिलाही डोस मिळालेला नाही. दुसरीकडे, कोरोना संसर्गही सातत्याने घटत आहे. यामुळे तज्ज्ञांना तांत्रिकदृष्ट्या सध्या बूस्टर गरजेचे वाटत नाही.
  • मुलांना सध्या लस का नाही? ब्रिटनसह जगभरातील प्रमुख देशांत सरासरी १० लाख कोराेनाबाधित मुलांपैकी फक्त २ मुलांना वाचवता आले नाही. म्हणजे मुलांत कोरोनामुळे मृ़त्यू होण्याचे प्रमाण अत्यंत कमीच आहे.

मुलांचे लसीकरण टाळण्यामागचे कारण : ब्रिटनचा अभ्यास व सीरो सर्व्हेचा अहवाल
ब्रिटिश विकली सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये सरासरी १० लाख बाधित मुलांपैकी केवळ दोघांचाच मृत्यू झाला. हाच ट्रेंड युरोपातील इतर देशांतही आहे. भारतात ७०% मुलांत अँटिबॉडी असल्याचे काही दिवसांपूर्वीच्या सीरो सर्व्हेत स्पष्ट झाले. म्हणजे त्यांना एकदा संसर्ग झालेला आहे. यामुळे काही महिने त्यांना धोका नाही. यामुळे मुलांचे लसीकरण टाळले जाऊ शकते. तथापि, लहान मुलांसाठी झायकोव्ह-डी लसीला मंजुरी मिळालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...