आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Second Wave Update | Coronavirus Outbreak In India, Corona Cases, Corona Second Wave Weakening In India, Covid 19 Update

देशात कोरोनाविषयी दिलासादायक बातमी:पहिल्या लाटेत पीकनंतर नवीन रुग्ण कमी होण्यास लागले 6 आठवडे, दुसऱ्या लाटेमध्ये 3 आठवड्यांनंतरच दररोजच्या रुग्णांमध्ये 50% पर्यंत घट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 दिवसांच्या सरासरी आकड्यांनुसार, देशात पहिल्या लाटेचा पीक 8 मे रोजी होता.

देशात कोरोनाची दुसरी लाट ज्या वेगाने पसरली होती, त्या वेगाने आता त्यामध्ये घटही नोंदवली जात आहे. दररोजच्या सात दिवसांच्या प्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पीकवरुन फक्त 3 आठवड्यांत दैनंदिन प्रकरणांमध्ये 50% घट नोंदवली गेली.

7 दिवसांच्या सरासरी आकड्यांनुसार, देशात पहिल्या लाटेचा पीक 8 मे रोजी होता. तेव्हा 3 लाख 91 हजार 263 कोरोनाची प्रकरणे नोंदवण्यात आली होती. या आकड्यांमध्ये काल 50% पर्यंत घट झाली आहे. म्हणजेच 29 मे रोजी हा आकडा एक लाख 95 हजार 183 पर्यंत पोहोचला.

पहिल्या लाटेच्या पीकविषयी बोलायचे झाले तर गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला 93,735 संक्रमित समोर आले होते. हे आकडे अर्धे होण्यास जवळपास 6 आठवडे लागले. म्हणजेच 30 अक्टोबरला 50% घटसह संक्रमितांचा आकडा 46,380 पर्यंत पोहोचला होता.

काल 1.65 लाख रुग्ण
देशात काल एक लाख 65 हजार 144 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा आकडा गेल्या 47 दिवसांमध्ये सर्वात कमी आहे. यापूर्वी 12 एप्रिलला एक लाख 60 हजार 854 केस आल्या होत्या. या दरम्यान 3,463 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि 2 लाख 64 हजार 342 लोक बरेही झाले.

बातम्या आणखी आहेत...