आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Speed In India| In The Case Of Getting The Most Infected Daily, India Is Now The 5th Country, More Than 3 Thousand Patients Were Found For The Third Consecutive Day.

कोरोनाचा वेग:रोज सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत भारत आता ५ वा देश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो भोपाळ रेल्वे स्टेशनचा आहे. बुधवारी तेलंगणा येथून प्रवासी कामगार येथे दाखल झाले. - Divya Marathi
हा फोटो भोपाळ रेल्वे स्टेशनचा आहे. बुधवारी तेलंगणा येथून प्रवासी कामगार येथे दाखल झाले.
  • भारतात सलग तिसऱ्या दिवशी ३ हजारांहून जास्त रुग्ण
  • नव्या बाधितांच्या बाबतीत आता अमेरिका, रशिया, ब्राझील, पेरू भारताच्या पुढे

कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत १५ व्या स्थानी आहे, मात्र रोजच्या रुग्णांच्या बाबतीत ५ सर्वाधिक गंभीर स्थिती असलेल्या देशात आपला समावेश झाला आहे. तीन मे रोजी लाॅकडाऊनचे ४० दिवस झाल्यानंतर भारतात सलग तीन दिवस अनुक्रमे ४२३९, ३३१८, ३०७४ रुग्ण आढळले. जगात फक्त अमेरिका, ब्राझील, रशिया, पेरू येथेच भारतापेक्षा जास्त रुग्ण आढळले. रोजच्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगातील सर्वात वाईट स्थितीच्या ८ देशांत आला आहे.

नव्या रुग्णांच्या बाबतीत भारत चौथा सर्वात बिकट स्थितीतील देश

अमेरिकेत रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या भारताच्या पाचपटीने जास्त आहे. मात्र तेथे नव्या रुग्णांचा आलेख स्थिरावला आहे. म्हणजे रोज रुग्ण वाढत नाहीत. भारत, ब्राझील, रशिया आणि पेरूत सतत रुग्ण वाढत आहेत.

> जर्मनी : सरासरी - १००८, आठवड्यात संख्या १५०० च्या वर गेली नाही.

> फ्रान्स : सरासरी - ८९२, आठवड्यात ५ दिवस हजारांहून कमी नवे रुग्ण

> इटली : सरासरी- १६४३. नवे रुग्ण घटून संख्या१०७५ पर्यंत पोहोचली आहे

> स्पेन : सरासरी -२४८६, नव्या रुग्णांत या आठवड्यात सर्वात मोठी घट आली

१० सर्वाधिक बाधित स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनीत नव्या रुग्णांची आठवड्याची सरासरी भारतापेक्षा कमी

भारताची सरासरी 2796, आठवड्यात एकदाच संख्या 2 हजारांखाली

> ब्राझील : एक आठवड्यापासून सरासरी संख्या ६ हजार इतकी आहे.

> अमेरिका : रुग्ण सर्वाधिक, मात्र आलेख स्थिरावला आहे.

> पेरू : नव्या रुग्णांची संख्या दोन वेळा ४ हजारांवर गेली आहे.

> रशिया : नव्या रुग्णांची संख्या १० हजारांपर्यंत पोहोचली आहे.

> भारत : ४ मे रोजी ४२३९ रुग्ण आढळले, जे मागील आठवड्याच्या सरासरीपेक्षा दुप्पट होते.

कोरोनाचे केंद्र राहिलेल्या चीनमध्ये २० दिवसांत १ मृत्यू, १२९ रुग्ण

> चीनमध्ये लॉकडाऊनच्या २१ दिवसांनंतर नवे रुग्ण घटण्यास सुरू झाले होते, मात्र भारतात ४२ दिवसांनंतरही वाढत आहेत.

> चीनमध्ये १७ एप्रिलनंतर फक्त १२९ बाधित आढळले आहेत. त्यात विदेशातून चीनमध्ये आलेले १११ जण आहेत. देशातील १८ आहेत.

> चीनमध्ये २३ जानेवारीला लॉकडाऊन सुरू झाल्याच्या २१ व्या दिवशी सर्वाधिक १४,१०८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्ण सतत घटले.

> रुग्ण घटण्यास सुरुवात झाल्यानंतरही चीनने बाधित हुबेई प्रांतात ६० दिवसांपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवला. भारतात लॉकडाऊनच्या ४३ व्या दिवशीही नव्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...