आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविड लक्षणे:चव, गंध कळत नसेल तरी कोरोना चाचणी, ही लक्षणे कोविड-19 च्या निकषांत समाविष्ट होणार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत ही लक्षणे तपासणीसाठी समाविष्ट करण्यात आली आहेत

गंध किंवा चव ही क्षमता अचानक नष्ट झाली तर तुम्हाला कोरोनाची चाचणी करावी लागू शकते. सूत्रांनुसार, सरकार या लक्षणांना कोविड-१९च्या लक्षणात समाविष्ट करण्याबाबत विचार करत आहे. गेल्या रविवारी कोविड-१९ वर झालेल्या राष्ट्रीय कार्यदलाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. मात्र, अद्याप यावर एकमत झालेले नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, बैठकीत काही सदस्यांनी ही लक्षणे कोविडच्या तपासणीसाठी समाविष्ट केली जावीत, असा सल्ला दिला. अनेक रुग्णांत अशी लक्षणे आढळून आल्याचा दाखला या सदस्यांनी दिला. मात्र तज्ज्ञांनुसार, ही लक्षणे स्पष्टपणे कोविडशी संबंधित नाहीत. मात्र या आजाराची ही प्राथमिक लक्षणे असू शकतात. अमेरिकेत ही लक्षणे तपासणीसाठी समाविष्ट करण्यात आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...