आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात तिसऱ्या लाटेत ज्या वेगाने रोज आढळणारे रुग्ण वाढत आहेत, त्याहीपेक्षा जास्त वेग मोठ्या शहरांत आहे. देशात सुमारे २० शहरांत संसर्गदर २०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी १०० चाचण्यांत सरासरी २० जण पाॅझिटिव्ह आढळत आहेत.
देशात प्रति एक लाख लोकसंख्येत १९ रुग्ण सापडत आहेत. गुरुग्राममध्ये प्रति एक लाख लोकसंख्येत १७९ रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण मोठ्या शहरांत सर्वाधिक आहे. कोलकात्यात रोज प्रति एक लाख लोकसंख्येत १५७, बंगळुरू अर्बनमध्ये १६३ रुग्ण, दिल्लीत १३९ रुग्ण, मुंबईत १३२ रुग्ण आढळत आहेत. तज्ज्ञांनुसार, ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत त्या हिशेबाने दिल्ली-मुंबईत पुढील आठवड्यात रुग्णसंख्या पीकवर जाऊ शकते. दरम्यान, देशात कोरोनाच्या परिस्थितीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मागील व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन अधिक संसर्गजन्य आहे. आरोग्यतज्ज्ञांची समिती स्थितीचे आकलन करत आहे. आपण सतर्क राहायला हवे. देशात १० दिवसांत ३ कोटी किशाेरवयीनांचे लसीकरण झाले आहे. ते आव्हानांविरुद्ध लढण्याची आपली तयारी दाखवते. देशात गुरुवारी काेरोनाचे २.५९ लाखापेक्षा जास्त नवे रुग्ण तर ३५२ मृत्यू झाले. हा २१ मे २०२१ नंतर नवे रुग्णांचा उच्चांक आहे.
अलर्ट... सण साजरे करा, पण सावधपणे
मकरसंक्रांतीनिमित्त आज देशभरात नद्यांत पुण्य स्नान होईल. यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविक येतील. यामुळे सर्वांनी मास्क वापरावा आणि फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे. खोकला, ताप तसेच घशात खवखव असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
चिंता... लोक सेल्फ-टेस्टिंग किटने तपासणी करत आहेत, मात्र पाॅझिटिव्ह रिपोर्ट शेअर करत नाहीत कोरोना महामारीच्या काळात लोक रुग्णालयात न जाता घरीच कोरोनाच्या टेस्ट किटचा वापर करत आहेत. यामुळे आरोग्य विभागाला कोरोनाबाधितांचा अचूक आकडा मिळत नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना अशा किटच्या विक्रीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. सांगितले जाते की, मुंबईच्या मेडिकल स्टोअरमधून अशा ३ लाख किट्सची विक्री झाली आहे. मात्र १ लाख लोकांनी बीएमसीच्या अॅपवर रिपोर्ट अपलोड केलेले नाहीत. आता बीएमसीने मेडिकल स्टोअर्सना टेस्ट किट विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्यास सांगितले आहे. अशीच स्थिती इतर शहरांतही आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे पाॅझिटिव्ह : राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना गुरुवारी कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. दुसरीकडे, आयआयएम अहमदाबादचे आणखी ११ जण काेरोनाबाधित झाले आहेत. येथे २ आठवड्यांत ८१ जण बाधित झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.