आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. तज्ञांच्या मते ही कोरोनाची तिसरी लाट आहे. कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉन देखील देशात वेगाने पसरतो आहे. देशात गेल्या 24 तासात 1.41 लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यापुर्वी गुरुवारी देखील कोरोना रुग्ण संख्येने एक लाखांचा टप्पा गाठला होता.
त्यामुळे देशभरात आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सात दिवसात 6,247 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात गुरुग्राममध्ये लहान मुलांना अधिक कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गुरुग्राममध्ये आतापर्यंत शेकडो मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांखालील 170 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याचवेळी 11 ते 18 वर्षे वयोगटातील 410 मुलेही या धोकादायक लाटेचा बळी ठरली आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याचे तज्ञ म्हणत आहेत.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी 40,925 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 14,256 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात 20 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 68.34 जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यातील 65.47 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत 1 लाख 41 हजार 614 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील विविध भागात 1 लाख 41 हजार 492 सक्रिय रुग्ण असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.