आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शंकेमुळे केंद्राने सज्जता वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी १,५०० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. हे सर्व प्रकल्प सुरू झाल्यानंतर ऑक्सिजन सपोर्टचे आणखी ४ लाख बेड वाढवता येतील. सध्या देशात ऑक्सिजन सपोर्टचे एकूण २.५५ लाख बेड आहेत. पीएमओनुसार, ‘बैठकीत अधिकाऱ्यांनी मोदींना ऑक्सिजन प्रकल्पांची माहिती दिली. मोदींनी प्रकल्पांचे संचालन व मेंटेनन्ससाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे व इतर सर्व जिल्ह्यांत प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्यास सागितले. अधिकारी म्हणाले, प्रकल्प चालवण्यासाठी ८ हजारांवर लोकांना प्रशिक्षण दिले जाईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या टंचाईमुळे मृत्यू वाढले होते. आता खबरदारीचा उपाय म्हणून पीएम केअर्स फंड, िवविध मंत्रालये व सार्वजनिक उपक्रमांच्या सहकार्यातून देशभरात १,५०० प्रकल्प उभारले जात आहेत.
केरळ-महाराष्ट्रात रुग्ण का वाढत आहेत याचा वैज्ञानिकांकडून नव्याने अभ्यास
महाराष्ट्र-केरळमध्ये नवे रुग्ण पुन्हा वाढणे तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाही ना?
सध्या असे म्हणणे घाईचे ठरेल. कारण सध्या संसर्गाची दुसरी लाट फक्त धिमी झाली आहे, पूर्णपणे संपलेली नाही. जेव्हा रोज आढळणारे नवे रुग्ण खालच्या स्तरापर्यंत येतील, त्यानंतर जर वेगाने नवे रुग्ण वाढत राहिले तरच संसर्गाची तिसरी लाट म्हटले जाईल.
नवे रुग्ण महाराष्ट्र-केरळमध्येच का वाढत आहेत? इतर राज्यांत तर तसे नाही.
सध्या त्याचे कुठले उत्तर नाही. त्यामुळे आम्ही वैज्ञानिकांचा एक गट तयार केला आहे. शुक्रवारी त्याची पहिली बैठक झाली. दोन्ही राज्यांत विशेष पथके पाठवली आहेत. तेथे नवे रुग्ण का घटत नाहीत याचा नव्याने वैज्ञानिक अभ्यास केला जात आहे. त्यानंतरच काही सांगता येईल.
या राज्यांत एखादा नवा व्हेरिएंट आहे का, त्यामुळे नवे रुग्ण वाढत आहेत का?
तसेही नाही. कारण दोन्ही राज्यांत ८५% पेक्षा जास्त रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचेच आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीतही ८५% रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचेच येत होते, पण तेथे नवे रुग्ण १०० पेक्षाही कमी आढळत आहेत. याउलट महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या रुग्णांची संख्या ८ ते १५ हजारदरम्यान राहत आहे. त्यामुळे हा प्रकार समजण्यापलीकडचा आहे.
गर्दीमुळे स्थिती बिघडत आहे, कोविडचे नियम मोडले जात आहे, असे म्हटले जात आहे...
काही दिवसांत मनालीतही गर्दी खूप झाली, उत्तराखंडमध्येही सतत गर्दीचे फोटो येत आहेत. दिल्लीच्या बाजारांतही गर्दी आहे. पण तेथे नवे रुग्ण वाढले नाहीत. केरळ-महाराष्ट्रातून तर तसे फोटो आले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण काय आहे हे वैज्ञानिक अभ्यासाद्वारेच स्पष्ट होईल.
डॉ. व्ही. के. पॉल, कोविड टास्क फोर्स, डॉ. नरेंद्र अरोरा, एईएफआय
दुसरी लाट सरलेली नाही... सध्या ६६ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट १०% पेक्षा जास्त
कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असल्याचे पाहून आरोग्य मंत्रालयाने इशारा देत म्हटले आहे की, दुसरी लाट अद्याप गेली नाही. गेल्या ७ दिवसांत ६६ जिल्ह्यांत टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १०% पेक्षा जास्त राहिला. देशाचे ८०% नवे रुग्ण ९० जिल्ह्यांतील आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले,‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या १७ सप्टेंबरला सर्वाधिक ९७,८९४ रुग्ण आढळले होते, तर दुसऱ्या लाटेत एका दिवसात सर्वाधिक ४,१४,१८८ रुग्ण या वर्षी सात मे रोजी आढळले होते. आता ३ ते ९ जुलैदरम्यान रोज सरासरी ४२,१०० नवे रुग्ण आढळले. लवकरच नवे रुग्ण आणखी घटतील अशी अपेक्षा आहे.’
केरळ-महाराष्ट्रात नवे रुग्ण वाढताहेत; तज्ज्ञांचे मत- या राज्यांत दुसऱ्या लाटेला वेग आला
- दर १०० चाचण्यांत ११ रुग्ण आढळत आहेत, तर देशात २ आढळत आहेत.
- केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या,राज्यात एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही. आम्ही तिसऱ्या लाटेसाठी तयारी केली आहे.
- महाराष्ट्रात अजूनही रोज ४०० पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. ही संख्या देशात होणाऱ्या मृत्यूंच्या जवळपास निम्मी आहे. राज्यात २१ जूननंतर नव्या रुग्णांची संख्या जवळपास स्थिर होती, पण आता वाढत आहे.
- महाराष्ट्र : २१ जूनपासून रुग्णवाढ; गेल्या ७ दिवसांत देशाचेे २१% रुग्ण येथेच आढळले; सक्रिय रुग्ण १.१४ लाख
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.