आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Third Wave | Marathi News | The Responsibility Of Following The Rules Will Remain With The States

कोरोना अपडेट:तिसऱ्या लाटेतही नियम पालनाची जबाबदारी राज्यांकडेच राहणार, बहुतांश राज्यांत शाळा-कॉलेज बंद

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सार्वजनिक ठिकाणी लसीकरणाचे प्रमाणपत्र आता अनिवार्य

देशात डेल्टा व ओमायक्राॅनमुळे कोरोना संसर्गात सातत्याने वाढ हाेत आहे. ही तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे तज्ज्ञांना वाटते. देशात याआधीच दाेन लाटांमुळे निर्बंध लागू राहिले आहेत. मार्च २०२० मध्ये पहिल्या लाटेदरम्यान केंद्राने जनता कर्फ्यू जाहीर झाला हाेता. लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली हाेती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलाॅक सुरू झाले. दुसऱ्या लाटेत राज्यांना निर्बंधांचे अधिकार देण्यात आले. आता तिसऱ्या लाटेतही राज्यांकडेच निर्बंधांचे अधिकार राहतील. बहुतांश राज्यांत रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे.

पहिली लाट - मार्च २०२० मध्ये रेल्वे ठप्प
मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० दरम्यान देशात काेराेना पहिली लाट हाेती. यादरम्यान केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचा पूर्ण लाॅकडाऊन केला हाेता. त्यात सर्व प्रवासी रेल्वेसेवा थांबवली हाेती. हाॅटेल-रेस्तराँ बंद हाेते. आैषधी व इतर अत्यावश्यक सुविधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवली गेली हाेती. टप्प्याटप्प्याने अनलाॅकची प्रक्रिया जून २०२० पासून सुरू झाली.

दुसरी लाट - फेब्रु.-जून २१ पर्यंत निर्बंध
देशात दुसऱ्या लाटेदरम्यान फेब्रुवारी ते जून २१ पर्यंत अनेक राज्यांत निर्बंध लागू झाले हाेते. महाराष्ट्रात मार्च २०२१ मध्ये लाॅकडाऊन जाहीर झाला हाेता. राजस्थान, कर्नाटक, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत लाॅकडाऊन लागू केला हाेता. पंजाब, गुजरातमध्ये निर्बंधासह अंशत: लाॅकडाऊन लागू झाला हाेता.

तिसरी लाट - काही राज्यांत सार्वजनिक
ठिकाणच्या गर्दीवर आणली मर्यादा {राजस्थानमध्ये सार्वजनिक ठिकाणी १०० लाेकांपेक्षा जास्त संख्येला मनाई आहे. पंजाबमध्ये लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य

- उत्तर प्रदेशात १४ जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीपर्यंत शाळा बंद. झारखंडमध्ये रात्री ८ वाजता बाजारपेठ बंद. - दिल्लीत सार्वजनिक परिवहन यंत्रणेला ५० टक्के क्षमतेसाठी परवानगी. गुजरातमध्ये शाळा-काॅलेज सुरू.

बातम्या आणखी आहेत...