• Home
  • National
  • Corona to journalist: Corona suffers from journalist who went to Kamal Nath's press conference! The former chief minister made himself a quarantine

पत्रकाराला कोरोनाः कमलनाथ यांच्या पत्रकार परिषेद गेलेल्या पत्रकाराला कोरोनाची लागण! माजी मुख्यमंत्र्यांनी स्वतःला केले क्वारंटाइन

  • कमलनाथ यांनी राजीनामा दिला त्या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावणाऱ्या प्रतिनिधीला कोरोनाची लागण

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 03:18:02 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वतःला क्वारंटाइन करत असल्याची घोषणा बुधवारी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भोपाळमध्ये एका मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तिचे वडील एक पत्रकार आहेत. त्यांनी कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली होती. ही पत्रकार परिषद 20 मार्च रोजी झाली होती तसेच यामध्ये इतर माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. याच पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांना यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात 600 बेड ठेवले राखीव

मध्य प्रदेशात कोरोनाचा फैलाव 6 जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. त्यामध्ये जबलपूर येथे 6, इंदूर येथे 4, भोपाळमध्ये 2, उज्जैन, ग्वाल्हेर आणि शिवपुरीत प्रत्येकी एक-एक पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश दिले, की ज्या ठिकाणी परदेशातून पाहुणे आले आहेत. त्या ठिकाणी सर्वच राष्ट्रीय उद्यान, पर्यटन क्षेत्र इत्यादींचा तपास करायला हवा. खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा देखील वापर करा. दुसरीकडे, राज्यातील प्रशासनाने भोपाळच्या हमीदिया रुग्णालय रिकामे करण्याचे निर्देश दिले. यातील 600 बेड आता कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेण्यात आले आहेत. अजुनही शिल्लक असलेल्या 200 पलंगांवर रुग्ण आहेत. त्यांना इतर ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहेत.

X