आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काेरोना संसर्ग:देशात नोव्हेंबरमध्ये काेरोना सर्वोच्च पातळीवर जाणार, आयसीयू बेड, व्हेंटिलेटरच्या टंचाईची शक्यता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 60% संभाव्य मृत्यू घटले
Advertisement
Advertisement

देशात काेरोनाचा संसर्ग नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो. आयसीएमआरच्या ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपनुसार, लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा संसर्गाचा वेग कमी होण्यास मदत मिळाली. यामुळे ही महामारी उच्चांकी पातळीवर पोहोचण्यासाठी ३४ ते ७६ दिवसांचा अधिक कालावधी लागू शकतो.

अहवालानुसार, पायाभूत सुविधांत दुरुस्तीच्या दिशेने सरकार करत असलेल्या कामामुळे स्थिती आणखी सुधारू शकते. सध्याच्या क्षमतेनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या स्थितीचा मुकाबला करता येईल. यानंतर मात्र आयसोलेशन बेड, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

60% संभाव्य मृत्यू घटले

लाॅकडाऊनमध्ये चाचण्या, उपचार व आयसोलेशनच्या दिशेने पावले उचलल्यामुळे उच्चांकाच्या वेळी रुग्णांची संख्या ७०% व एकूण रुग्णसंख्येला २७% पर्यंत घटवण्याचा अंदाज आहे. यामुळे ६०% लोकांचे प्राण वाचवता आले आहे.

Advertisement
0