आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आपण कोरोनाव्हायरस संसर्गाने ग्रस्त असल्यास, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे आरामदायक ठरू शकते असा दावा ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास संक्रमणाची लक्षणे कमी करण्यासोबत आजाराचा कालावधी देखील कमी केला जाऊ शकतो.
संशोधकांनी कोरोना संसर्ग झालेल्या 66 रुग्णांवर हे संशोधन केले. या रुग्णांच्या नाक आणि गळ्यात कोरोनाचा संसर्ग होता.
कोरोना रुग्णांना उपचारासोबत गुळण्या करण्यास सांगितले
संशोधकांचे म्हणणे की, कोरोनाच्या रुग्णांना उपचारासोबत मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितले. 12 दिवसांनंतर त्यांच्या नाकातील सँपल घेण्यात आले. यानंतर संक्रमणाच्या लक्षणांमध्ये कमतरता आल्याचे अहवालात समोर आले.
संसर्ग सरासरी 2.5 दिवसांनी कमी झाला
जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, गुळण्या केलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये सरसरी 2.5 दिवसानंतर संसर्ग कमी झाला. संशोधक डॉ. संदीप रामालिंगम यांचे म्हणणे आहे की, गुळण्या केल्यास कोरोनाच्या संसर्गावर परिणाम दिसतो आणि कमी वेळात आजारातून मुक्त होण्याचा आशा वाढते.
लवकरच ट्रायल सुरू होईल
संशोधकांचे म्हणणे आहे की, यावर लवकरच ट्रायल सुरु केले जाईल. अलीकडेच आंतरराष्ट्रीय विषाणू तज्ञांच्या संघाने माउथवॉशपासून कोरोनाचा प्रभाव कमी केल्याचा दावा केला होता. माऊथवॉश कोरोनाव्हायरस पेशीस संसर्गित करण्यापूर्वी मारू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
कोरोना व्हायरसच्या चारही बाजुने एक चर्बीसारखी शेल असते. माउथवॉशमधील रसायन ही शेल वितळवू शकते. अशाप्रकारे कोरोना तोंडात संपवून गळ्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.