आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Trend | Patients On The Rise, 29 Per Cent Patients Of Two Sub variants Of Omycron, 60 Per Cent Weekly Increase In Patients In India

कोरोना ट्रेंड:रुग्ण वाढू लागलेत, ओमायक्रॉनच्या दोन सबव्हेरिएंटचे 29 टक्के रुग्ण, भारतात आठवड्यात रुग्णांत 60 % वाढ

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लसीकरणादरम्यान अमेरिका, युरोप, आशिया व आफ्रिकेच्या प्रमुख देशांत काेरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. आठवड्याचा आढावा घेतल्यास सर्वाधिक चिंता युरोपात दिसून येते. कारण तेथे एका आठवड्यात रुग्णांचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढले आहे. युरोपात सर्वाधिक ५८ टक्के रुग्ण इटलीत वाढले आहेत. ब्रिटनमध्ये ४० टक्के, ग्रीस-८१ टक्के, डेन्मार्क-४० टक्के, नाॅर्वे-३७ टक्के, नेदरलँड्स-३७ टक्के, स्वित्झर्लंड-३० टक्के रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेतील आठवड्याच्या रुग्णसंख्येत भलेही वाढ नसली तरी दैनंदिन रुग्णांची संख्या ८५ हजारांवर गेली आहे. साेमवारपर्यंत येथे नवे रुग्ण ५० हजारांवर येत हाेते. ब्राझीलमध्येही आठवड्यातील रुग्ण वाढले आहेत. साेमवारी ब्राझीलमध्ये ४५ हजारांवर रुग्ण हाेते. परंतु आता ही संख्या ६८ हजारांवर गेली आहे. आशियात एक आठवड्यात सर्वाधिक ६० टक्के रुग्ण भारतात वाढले आहे. संसर्गात वाढ हाेण्यामागील कारण काेरोनाच्या ओमायक्रॉनचे दोन नवे सबव्हेरिएंट असल्याचे सांगितले जाते.
रुग्ण वाढ : जर्मनीत नवी रुग्णसंख्या जास्त

देश नवे रुग्ण२ दिवसापूर्वी
जर्मनी 1,22,597 6,911
फ्रान्स 95,217 11,566
अमेरिका 84,120 52,039
ब्राझील 68,102 51,925
इटली 62,704 17,131
ऑस्ट्रेलिया 31,551+20,207
ब्रिटन 16,430 12,142
भारत 12,249 9,923
भारत : देशात सक्रिय रुग्ण ८१, ६८७

भारतात चाेवीस तासांत १२ हजार २४९ नवे रुग्ण समाेर आले आहेत. ही संख्या साेमवारच्या ९ हजार ९२३ च्या तुलनेत २३.४ टक्क्यांहून जास्त आहे. चाेवीस तासांत १३ जणांचा मृत्यूही झाला आहे. देशात एकूण सक्रिय रुग्णसंख्या वाढून ती ८१ हजार ६८७ झाली आहे. बाधित सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.१९ टक्के झाले.

दिलासा : रुग्ण वाढले, पण मृत्युसंख्येत घट
जगभरात रुग्णसंख्येत वेगाने वाढ हाेत आहे. परंतु आठवड्याच्या आधारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठवड्यात जगात ७ हजार ९६८ मृत्यू झाला. त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत त्याचे प्रमाण १९ टक्के कमी आहे. युरोपात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मृत्यूचे प्रमाण २४ टक्के कमी आहे.

पाच वर्षीय मुलांचे लसीकरण सुरू
जगभरात लसीकरणाच्या १८ महिन्यांनंतर सहा महिने ते ५ वर्षे या वयाेगटातील मुलांसाठी अमेरिकेतील नियामक संस्थेने हिरवी झेंडी दाखवली आहे. याबरोबरच काेरोनापासून बचाव करण्यासाठी लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्याची सुरुवात अमेरिकेतील ओहियाेपासून झाली आहे. डायटन चिल्ड्रन हाॅस्पिटलमध्ये ९ वाजता २ वर्षांच्या बालकास फायझर-बायाेएनटेकचा डाेस देऊन झाला. लहान मुलांसाठी ही लस तीन डाेसची आहे.

बातम्या आणखी आहेत...