आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट्स:दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यास किरकोळ लक्षणेही घातक, गेल्या 24 तासांत 17,224 नवे रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 17 हजार 224 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, देशात 86 हजार 822 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

याच्या एक दिवस आधी देशात 13 हजार 195 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यास किरकोळ लक्षणेही धोकादायक ठरू शकतात, असे एका अहवालात म्हटले आहे.

पुन्हा संसर्गामध्ये किरकोळ लक्षणे देखील ठरू शकतात धोकादायक
अमेरिकेतील जॉर्जियामध्ये पॉल स्मिथला फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोना झाला होता. तेव्हा त्याला फक्त एक दिवस ताप आला आणि थोडासा घसा खवखवत होता. तो 3 दिवसात बराही झाला. दवाखान्यात जाण्याची गरज पडली नाही. मार्च २०२१ मध्ये पॉलला पुन्हा संसर्ग झाला. यावेळी त्यांना 13 दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. शरीरात वेदना 3 महिने कायम होत्या. त्यांना अजूनही नीट झोप येत नाही.

डिसेंबर २०२१ मध्ये पॉलला तिसऱ्यांदा संसर्ग झाला. 7 दिवस आयसीयूमध्ये राहिल्यानंतर त्यांना 15 दिवस जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आल्या आहेत, ज्या 2 वर्षांपूर्वी नव्हत्या. अमेरिकेत पॉलसारखे लाखो लोक आहेत ज्यांना दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा संसर्ग झाला आहे. संसर्गजन्य रोग तज्ञांनी अशा 5 लाख लोकांच्या सरकारी डेटाची छाननी केली आहे. या आधारावर तयार करण्यात आलेल्या अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीला जितक्या वेळा संसर्ग होतो तितका जीवाला धोका वाढतो.

भारतातील 95% पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे
रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, संसर्गादरम्यान प्रथमच कोणत्याही प्रकारची सौम्य समस्या आली असेल तर. दुसऱ्या संसर्गामुळे ही समस्या जीवघेणी ठरू शकते. भारतात, सप्टेंबर 2021 मध्ये, 95% लोकसंख्येला संसर्ग झाल्याचे आढळून आले. असे मानले जाते की, दररोज जे 12,000 रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी बहुतेकांना पुन्हा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सरकार वारंवार सावध राहण्यास सांगत आहे.

देशातील कोरोनाची स्थिती
भारतातील राज्यांमध्ये महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत येथे कोरोनाचे 5 हजार 218 नवीन रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी केरळमध्ये 3 हजार 890 नवीन रुग्ण आढळून आले आणि 7 रुग्णांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत 1,934 नवीन रुग्ण आढळले आहेत, कर्नाटकात 858 प्रकरणे आणि यूपीमध्ये 634 नवीन रुग्ण आढळले आहेत.