आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Update | Cabinet Secretary Rajiv Gauba Meeting Today News Updates On District Magistrates Of 13 Coronavirus Hit Cities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर चर्चा:कॅबिनेट सचिव राजीव गौबा आज 13 शहरांमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार, लॉकडाउनच्या धोरणाविषयी चर्चा होण्याची शक्यता

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र मुंबईत रेल्वेची वाट पाहणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. - Divya Marathi
हे चित्र मुंबईत रेल्वेची वाट पाहणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
  • लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे
  • देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1.58 लाखाहून अधिक आहे

कॅबिनेट सचिव राजीव गौबा आज 13 कोरोना बाधित शहरांचे डीएम आणि पालिका आयुक्तांसमवेत चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्य सचिव व प्रधान आरोग्य सचिवदेखील सहभागी होतील. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आणि लॉकडाऊनबाबत पुढील योजनांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, हैदराबाद, कोलकाता, हावडा, इंदूर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू, थिरुवल्लूर या 13 शहरांतील अधिकारी या बैठकीस उपस्थित राहतील. 

लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत

देशात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू असून 31 मे रोजी तो संपणार आहे. लॉकडाऊन आणखी वाढविण्यात येईल की नाही याबाबत सरकारने अद्याप सांगितले नाही. कोरोना परिस्थिती आणि राज्यांचा अभिप्रायाच्या आधारावर सरकार लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहे. 

देशातील कोरोनाची 1.58 लाखाहून अधिक प्रकरणे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 58 हजार 333 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील 86 हजार 110 जणांवर उपचार सुरू आहे. 67 हजार 692 रुग्ण बरे झाले आणि 4 हजार 531 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील 24 तासांत 6 हजार 566 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 194 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

बातम्या आणखी आहेत...