आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update । Corona In India । Last 24 Hours, 15,981 People Corona Positive

देशात कोरोनाचा वेग मंदावला:गेल्या 24 तासात 15 हजार 981 जणांना कोरोनाची बाधा तर 166 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू, 0.60 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा धोका आता कमी झाला असून, लसीकरणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र कोरोनाचा धोका पुर्णपणे टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासात 15 हजार 981 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 166 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात 4 लाख 51 हजार 980 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना या भयावह विषाणूमुळे देशभरात आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 53 हजार 573 जण ग्रासले आहे. त्यापैकी 3 कोटी 33 लाख 99 हजार 961 रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशातील विविध भागात 2 लाख 1 हजार 632 रुग्णांवर उपचार सुरु असून, त्याचे प्रमाण 0.60 टक्क्यावर आले आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 97.23 कोटी इतके डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यात देखील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 2,149 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 198 जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 15 हजार 316 जणांनी कोरोनावर मात केली असून, रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 97.38 टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...