आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे प्रभावित देशातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या मेट्रो शहरांचा समावेश आहे. तमिळनाडूतील सर्वाधिक 22 जिल्ह्यांना या यादीत ठेवले आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्रप्रदेशातील प्रत्येकी 11 जिल्ह्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीतील सर्व 9 जिल्ह्यांना हॉटस्पॉट शहरांमध्ये समावेश केला आहे. तसेच कर्नाटकातील 8 जिल्हे हॉटस्पॉटच्या श्रेणीत समाविष्ट आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, हॉटस्पॉट्स किंवा रेड झोन हे असे जिल्हा किंवा शहरे आहेत जिथे देश किंवा राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. यासोबतच जेथे संक्रमणाचा स्तर अधिक आहे आणि 4 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वेळेत केस दुप्पट झाले आहेत, त्यांनाही हॉटस्पॉट मानले जाईल. तर ग्रीन झोन तो भाग आहे जिथे 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण मिळाला नाही.
दिल्लीत संपर्क ट्रेसिंग तीव्र गतीने
दिल्लीतील दक्षिण दिल्ली, शहादरा, दक्षिण पूर्व, पश्चिम, उत्तर, मध्य आणि नवी दिल्ली जिल्हे रेड झोन आहेत. मागील 24 तासांत येथे 17 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे संक्रमितांची संख्या 1 हजार 578 झाली आहे. आतापर्यंत दिल्लीत 32 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. अशात सरकारने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तीव्र केली आहे. दक्षिण दिल्लीत एक पिझ्झा डिलेव्हरी मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या 72 कुटुंबांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याच्यासोबत काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना देखील आयसोलेट केले आहे.
207 जिल्हे ज्यात संसर्ग पसरण्याची भीती
देशातील 207 जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. या जिल्ह्यांवर मंत्रालय आणि डॉक्टरांच्या पथकाचे लक्ष आहे. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले होते की, हॉटस्पॉट श्रेणीत न येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 20 एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये काही सवलती दिली जातील. सवलत दिल्यानंतरही लोकांना सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागणार आहे. जर नियम मोडल्याच्या बातम्या आल्यास त्यांना देण्यात आलेल्या सवलती त्वरित रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी सांगतिले.
20 राज्यांतील या जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश
राज्य | किती जिल्हे | कोणते जिल्हे |
तमिळनाडु | 22 | चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोयंबटूर, ईरोड, तिरुनेलवेली, डिंडिगल, विल्लीपुरम, नामक्कल, थेनी, चेंगलपट्टू, थिरूप्पूर, वेल्लूर, मदुराई, तुतिकोरीन, करूर, विरुद्धुनगर, कन्याकुमारी, कुड्डलूर, तिरुवल्लूर, तिरुवरुर, सेलम, नागपटि्टनम |
राजस्थान | 11 | जयपूर, टोंक, जोधपूर, बांसवारा, कोटा, झूंझनू, भीलवाडा, जैसलमेर, बिकानेर, झालावार, भरतपूर |
महाराष्ट्र | 11 | मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई सबअर्बन, नाशिक |
आंध्रप्रदेश | 11 | कुरनूल, गुंटूर, नेल्लूर, प्रकाशम कृष्णा वायएसआर, पश्चिम गोदावरी, चित्तूर, विशाखापट्टनम, पूर्वी गोदावरी, अनंतपुर |
दिल्ली | 9 | दक्षिण दिल्ली, शहादरा, दक्षिण पूर्वी, पश्चिम, उत्तर, मध्य, पूर्वी आणि नवी दिल्ली |
उत्तरप्रदेश | 9 | आग्रा, गौतमबुद्धनगर, मेरठ, लखनऊ, गाझियाबाद, सहारनपुर, शामली, फिरोजाबाद, मुरादाबाद |
तेलंगाणा | 8 | हैदराबाद, निजामाबाद, वारंगल अर्बन, रंगारेड्डी, जोगुलमबगडवल, मेडचल मलकजगीरि, करीमनगर, निर्मल |
कर्नाटक | 8 | बंगळुरू अर्बन, म्हैसूर, बेलगावी, दक्षिण कन्नड़, बीदर, कलबुर्गी, बागलकोट, धारवाड |
जम्मू-काश्मिर | 6 | श्रीनगर, बांदीपोरा, बारामूला, जम्मू, ऊधमपुर, कुपवाडा |
केरळ | 6 | कासरगोड, कन्नूर, एर्नाकुलम, मलाप्पुरम, तिरुवनंतपुरम, पथानमथिट्टा |
मध्यप्रदेश | 5 | इंदूर, भोपाळ, खरगौन, उज्जैन, होशंगाबाद |
गुजरात | 5 | अहमदाबाद, सूरत, वडोदरा, भावनगर, राजकोट |
हरियाणा | 4 | नूह, गुडगाव, फरीदाबाद, पलवल |
पंजाब | 4 | सासनगर, एसबीएस नगर, जालंधर, पठाणकोट |
पश्चिम बंगाल | 4 | कोलकाता, हावडा, पूर्वी मिदनापुर, उत्तर 24 परगना |
ओडिशा | 1 | खुर्दा |
बिहार | 1 | सीवान |
चंडीगढ़ | 1 | केंद्र शासित प्रदेश |
छत्तीसगढ़ | 1 | कोरबा |
उत्तराखंड | 1 | देहरादून |
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.