आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Update : Due To Lockdown, The Train Service And Domestic And International Flights Will Be Closed Till 3 May 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे/विमानसेवा 3 मे पर्यंत बंद:लॉकडाउनमुळे देशात पहिल्यांदा 43 दिवस रेल्वे बंद राहणार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील बंद राहतील; कोरोना रोखण्यासाठी आवश्यक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे आणि विमान सेवांमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याची मोठी घोषणा केली. यासोबत दळणवळणाची मोठी साधने असणाऱ्या रेल्वे गाड्या आणि बससेवा 3 मेपर्यंत बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यादरम्यान स्थानिक आणि आंतरराज्य वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या बसेसही बंद ठेवल्या जातील.

22 जानेवारीच्या जनता कर्फ्यूपासून देशभरातील प्रवासी गाड्या बंद आहेत. सलग 43 दिवस रेल्वे गाड्या बंद राहण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाउन वाढवण्याच्या घोषणेनंतर रेल्वेने एक निवेदन जारी करत प्रीमियम गाड्या, मेल आणि एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो आणि कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या 3 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवणार असल्याचे सांगितले. मात्र यादरम्यान मालगाड्या चालू राहतील.

3 मे नंतर रेल्वे गाड्या सुरू होतील?

सरकार काही निवडक मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू करू शकते. असे मानले जाते की 30 एप्रिलनंतरही संपूर्ण क्षमता असलेल्या गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही. यामुळे हळू-हळू रेल्वे गाड्या सुरु करण्याती तयारी केली जात आहे. 

दुसरीकडे लॉकडाउन वाढल्याने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील बंद केली जातील, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान ज्या प्रवाशांनी 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही फ्लाईटचे बुकिंग केले असेल तर त्यांचे हे पैसे सुरक्षित राहतील, असे आश्वासन एअरलाईन कंपन्यांनी दिले आहे.

सरकारने कोणता निर्णय घेतला?

देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे 23 मार्चपासून आणि देशांतर्गत उड्डाणे 25 मार्चपासून बंद आहेत. मंगळवारी पंतप्रधानांच्या भाषणानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की 3 मे रोजी रात्री 11:59 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे बंद ठेवण्यात येतील.

उड्डाणे बंद करण्याचा निर्णय महत्त्वाचा का आहे?

देशातील सुमारे 20 विमानतळांवरुन आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे चालवली जातात. या विमानतळांवर 55 देशांतील 80 शहरांसाठी विमाने उड्डाणे घेतात. जगभरात कोरोना व्हायरस परसल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी ठेवणे गरजेचे आहे. फेब्रुवारी 2019 च्या एका रिपोर्टनुसार, देशात एका वर्षात जवळपास 32 कोटी आंतराष्ट्रीय प्रवासी या उड्डाणांचा वापर करतात. तर देशात प्रत्येक महिन्याला 1.3 कोटी आणि वार्षिक 14 कोटी प्रवासी देशांतर्गत उड्डाणांनी प्रवास करतात. ही देखील एक मोठी संख्या आहे. यामुळे कोरोना टाळण्यासाठी ही उड्डाणे बंद करणे आवश्यक आहे. 

3 मे नंतर उड्डाणे सुरू होतील?

यावर स्पष्टपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, "लॉकडाउननंतर आम्ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी दूर करण्याचा विचार करू. आम्हाला समजते की लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पण आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी सहकार्य करावे."

बातम्या आणखी आहेत...