आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update : Health Ministry Press Conference On Covid 19, Secretary Said If There Had Not Been A Lockdown, There Would Have Been 45,000 Cases In The Country,

कोरोना अपडेट:सरकारने वेळीच कठोर पावले उचलली नसती तर आतापर्यंत देशात संक्रमित लोकांची संख्या 45 हजार झाली असती - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो गुवाहाटीचे आहे. आठगाव स्मशानभूमीत राहणार्‍या लोकांची येथे तपासणी केली जात आहे. - Divya Marathi
हा फोटो गुवाहाटीचे आहे. आठगाव स्मशानभूमीत राहणार्‍या लोकांची येथे तपासणी केली जात आहे.
  • जगभरात 41% ग्रोथ रेटने संसर्ग पसरत होते, अशात 15 एप्रिलपर्यंत देशात 8.2 लाख लोक संक्रमित झाले असते

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी कोरोनायरस संसर्गाच्या प्रसाराबद्दल एक मोठे विधान केले. मंत्रालयाचे सहसचिव, लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की जगभरात कोरोनाव्हायरस संसर्ग 41% च्या वाढीवर पसरत आहे. सुरुवातीला सरकाने पावले उचलली नसती तर भारतात या वाढीच्या प्रमाणानुसार 15 एप्रिलपर्यंत 8.2 लाख लोकांना संसर्ग झाला असता.

ते म्हणाले की, देशात लॉकडाउनपूर्वी संक्रमणाची ग्रोथ रेट 28.9% होता. यानुसार पाहिले असता 15 एप्रिलपर्यंत देशात संक्रमित लोकांची संख्या 1.2 लाख होईल. मात्र सरकारने लॉकडाउननंतरही कंटोन्मेंट एरिया निश्चित करण्यासारखी महत्वाची पावले उचल्याने परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. जर तसे झाले नसते तर आज देशात संक्रमित लोकांची संख्या जवळपास 45 हजारांच्या जवळ गेली असती.

देशात 586 कोविड रुग्णालये सज्ज

अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत देशात 586 कोविड रुग्णालये तयार झाली आहेत. यांमध्ये एक लाखांहून अधिक आयसोलेशन बेड आणि 11 हजार आयसीयू बेड आहेत. त्यांची संख्या दररोज वाढविली जात आहे. शनिवारी आरोग्य सचिवांनी पीपीई, व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट यासह सर्व राज्यांतील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले. प्रत्येकाला त्यांच्या गरजेनुसार सर्व काही पुरवले जाईल असे आश्वासनही दिले आहे.  

रॅपिड टेस्टिंग किट्स 2-3 दिवसात उपलब्ध होतील

आयसीएमआरच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अद्याप रॅपिड टेस्टिंग कीट मिळाली नाही. दोन तीन दिवसांत मिळतील. यानंतर देशभरात याद्वारे टेस्ट घेतल्या जाईल. या किटच्या सहाय्याने विषाणू मानवी शरीरात कधी शिरला होता? तो गेला असता, तो बरा झाला होता काय? किंवा तरीही तो संक्रमित आहे याबाबत माहिती मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...