आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update India | Covid 19 | Marathi News | Corona Slowed In The Country; 1.07 Lakh New Corona Patients And 865 Deaths In Last 24 Hours

दिलासायक!:देशात कोरोनाचा वेग मंदावला; गेल्या 24 तासात 1.07 लाख नवे कोरोना रुग्ण, तर 865 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा घसरता आलेख पाहायला मिळत आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. शनिवारी देशभरात 1 लाख 7 हजार 474 रुग्णांची भर पडली. तर 2 लाख 13 हजार 246 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याचदरम्यान 865 रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

देशात शुक्रवारी 1.27 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले होते. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी सापडलेल्या रुग्णांत सुमारे 20 हजारांची घसरण पाहायला मिळाली. उपचारादरम्यान गुरुवारी 1072 तर शुक्रवारी 1059 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या ही 12.15 लाख इतकी आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून, या भयावह विषाणूने आतापर्यंत 4.21 कोटी जण ग्रासले आहेत.

एक नजर देशाचा कोरोना आकडेवारीवर
एकूण कोरोनाग्रस्त 4.21 कोटी
रुग्ण बरे झालेले 4.04 कोटी
एकूण मृत्यू 5.01 लाख
रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 7.42 टक्के

महाराष्ट्राला मोठा दिलासा

राज्यात गेल्या 24 तासात 11 हजार 394 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासायक म्हणजे याचदरम्यान सुमारे 21 हजार 677 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यापुर्वी शुक्रवारी राज्यात 13 हजार 840 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 81 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात सध्या 1.33 लाख सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाने 77.94 लाख जण ग्रासले आहेत. त्यातून 75.13 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 1.43 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण सक्रिय होण्याचा दर हा 7.34% इतका आहे.

बातम्या आणखी आहेत...