आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 1925 New Cases Were Reported In The Last 24 Hours, Delhi Has The Highest Number Of Deaths After Two Months

देश कोरोना अपडेट:गेल्या 24 तासात 2,288 नवीन रुग्ण, 10 जणांचा मृत्यू; दोन महिन्यांनंतर दिल्लीत सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गेल्या 24 तासात 2 हजार 288 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात 19 हजार 637 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी कोरोनाते 2 हजार 704 रुग्ण आढळले होते. तर शनिवारी 3 हजार 451 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 4.25 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण हा 98.74 टक्के इतका आहे. तर रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 0.95 टक्के आहे.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण राजधानी दिल्लीत पाहायला मिळाले. दिल्लीत गेल्या 24 तासात 799 रुग्णांची भर पडली. तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यापूर्वी 4 मे रोजी 4 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दिल्लीत रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 4.94 टक्के इतका असून, रविवारी 1422 कोरोना रुग्ण आढळले होते, तर दिलासादायक म्हणजे एकही जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नव्हता, सध्या दिल्लीतील पॉझिटिव्हीटी रेट हा 5.34 टक्के इतका आहे.

दिल्लीपाठोपाठ 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

दिल्लीसह हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 78 टक्के रुग्ण आहेत. दिल्लीत 799, तर हरियाणात 371, उत्तर प्रदेशात 218 आणि महाराष्ट्रात 121रुग्णांची नोंद करण्यात आली. दिलासादायक म्हणजे तीनही राज्यात कोरोनामुळे गेल्या 24 तासात एकही रुग्णाचा मृत्यू झाला.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कोरोना नियंत्रणात

गेल्या 24 तासात मध्यप्रदेशात 28 तर राजस्थानमध्ये 102 कोरोना रुग्ण सापडले आहेत. मात्र दिलासादायक म्हणजे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी मध्यप्रदेशात 27 तर राजस्थानात 91 रुग्णांची भर पडली होती.

आयआयटी कानपूर बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

कानपूर आयआयटी कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत 25 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सर्व कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्यांना आयआयटीमध्ये येण्यास मज्जाव घालण्यास आला आहे.

बातम्या आणखी आहेत...