आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update India | Today Corona Petient In India | 12,000 New Patients Were Found, 7 Positive For Every 100 Tests In Delhi

देशात 4 महिन्यांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण:12,000 नवीन रुग्ण आढळले, दिल्लीत प्रत्येक 100 चाचण्यांमागे 7 जण पॉझिटिव्ह

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 4 महिन्यांनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. बुधवारी देशात 12,133 नवीन रुग्णांची भर पडली. यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी 13,166 नवीन रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत 7,601 जणांना कोरोनावर मात केली असून, 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 4,024 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 3,028 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 19,261 इतकी आहे. येथे कोरोनाच्या BA.5 व्हेरियंटचे 4 रुग्ण आढळून आले आहेत.

दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट 7.01%
देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रमाण वाढत आहे. हेल्थ बुलेटिननुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,375 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथील पॉझिटिव्हिटी रेट हा 7.01% इतका आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 622 नमुने तपासण्यात आले आहेत. तर दिलासादायक म्हणजे बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आरोग्य बुलेटिननुसार, दिल्लीतील सक्रिय रुग्णांची संख्या 3,643 आहे.

पश्चिम बंगालमध्ये 200 हून अधिक नवीन रुग्ण

पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 230 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 20,20,774 वर पोहोचला आहे. एका हेल्थ बुलेटिननुसार, अडीच महिन्यांत प्रथमच राज्यातील संसर्गाची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. येथील पॉझिटिव्हिटी रेट हा 1.85% वरून 2.95% पर्यंत वाढला आहे. तर मृतांची संख्या 21,207 वर पोहोचली आहे.

डॉ. अँथनी फौसी कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अँथनी फौसी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, 81 वर्षीय फौकी यांचे पूर्णपणे लसीकरण झाले असून त्यांनी दोन बूस्टर डोस देखील घेतली आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची कळते.

बातम्या आणखी आहेत...