आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशात शुक्रवारी सक्रिय रुग्णांचा आकडा हा तेरा लाखांच्या पार गेला आहे. सध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात देशात 90 हजार 542 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलासादायक म्हणजे आज 36 हजार 889 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 63 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
देशात सध्या 13 लाख 19 हजार 789 सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर देशातील विविध भागात उपचार सुरू आहेत. कोरोना या भयावह विषाणूने आतापर्यंत सुमारे 3 कोटी 48 लाख जण विळख्यात सापडले आहेत. तर 4 लाख 85 हजार 413 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासात 24 हजार 383 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आजची आकडेवारीत घसरण पाहायला मिळाली आहे. तर 34 जणांचा गेल्या 24 तासात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 26 हजार 236 जणांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे 46 हजार रुग्ण
राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 46 हजार 406 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासात 34 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून, 36 जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दिलासादायक म्हणजे राज्यात आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. राज्यात सध्या 2.51 लाख सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत राज्यात 70.81 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 66.83 लाख जण कोरोनामुक्त झाले असून, 1 लाख 41 हजार 737 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 22 टक्के इतका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.