आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 41 हजार 983 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 40,816 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सोबतच गेल्या 24 तासात 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 66 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अवघ्या एका दिवसात एक लाखांपेक्षा रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तज्ञांच्या मते ही कोरोनाची तिसरी लाट असून, सलग दोन दिवस कोरोना रुग्णांचा आकडा हा एक लाखांच्या पार गेला आहे. यापुर्वी गुरुवारी 1 लाख 17 हजार 94 रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 40,925 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 18,213 रुग्ण सापडले आहेत. तर दिल्लीत देखील 17,335 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.
राज्यात कोरोनाचा हाहाकार
राज्यात शुक्रवारी 40,925 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 14,256 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात 20 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68.34 जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यातील 65.47 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत 1 लाख 41 हजार 614 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील विविध भागात 1 लाख 41 हजार 492 सक्रिय रुग्ण असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 18213 रुग्ण आढळले
पश्चिम बंगालमध्ये गेल्या 24 तासात 18,213 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दिलासादायक म्हणजे 7912 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात 18 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 17.11 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 16.40 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, 19,864 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 51,384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.