आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मंगळवारी 1.58 लाख नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. दिलासादायक म्हणजे 2.80 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचारादरम्यान 1 हजार 721 जणांचा मृत्यू झाला आहे. यापुर्वी सोमवारी 1 लाख 67 हजार 59 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली होती. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 8 हजार 522 कमी रुग्ण आढळले आहेत. हा एक दिलासाच म्हणावा लागेल.
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांत घसरण पाहायला मिळत आहेत. आठ जानेवारी रोजी देशात 1.59 लाख रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 20 जानेवारीला 3.47 लाख रुग्ण आढळले होते. मात्र 20 जानेवारीनंतर देशाच्या रुग्णसंख्येचा आलेख घसरताना पाहायला मिळत आहे.
देशात सध्या 16.13 लाख रुग्णांवर देशातील विविध भागात उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्यांच्या तुलनेचा जर आपण विचार केला तर कोरोना रुग्णसंख्येत 1,23,323 रुग्णांची घसरण पाहायला मिळाली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 4.16 कोटी इतका झाला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 1721 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले असून, उपचारादरम्यान 1063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनास्थितीवर एक नजर
पाच राज्यात कोरोनाचा हाहाकार
1. केरळ
केरळमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून, मंगळवारी 51 हजार 887 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 40 हजार 383 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी दिवसभरात उपचारादरम्यान 142 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी केरळमध्ये 42 हजार 154 रुग्ण आढळले होते. तर 91 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 9733 जास्त रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत केरळमध्ये 60.77 लाख जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातील 53.53 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 55,600 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळचा पॉझिटिव्हिटी रेट हा 42.86% इतका आहे.
2. तामिळनाडू
तामिळनाडूत मंगळवारी 16 हजार 96 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 25 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात उपचारादरम्यान 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात 19 हजार 280 रुग्ण आढळले होते. तर 20 जणांचा मृत्यू झाला होता. तामिळनाडू आतापर्यंत 33.61 लाख रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातील 31.35 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 37599 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.88 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 12.32% इतका झाला आहे.
3. महाराष्ट्र
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 7 हजार 735 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 30 हजार 93 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारी राज्यात 156 हजार 140 कोरोनाबाधित आढळले होते. तर 39 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात सध्या 1.91 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 77.35 लाख जणांना कोरोना होऊन गेला आहे. त्यात 73.97 लाख रुग्ण उपचारातून घरी परतले आहेत. तर 1.42 लाख जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9.40 टक्के इतका आहे.
4. कर्नाटक
कर्नाटक राज्यात मंगळवारी 14 हजार 366 रुग्णांची भर पडली. तर 60 हजार 914 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याचदरम्यान 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी राज्यात 24 हजार 172 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 56 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात आतापर्यंत 38.23 लाख जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातील 35.87 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 39 हजार 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील विविध भागात 1.97 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 13.85% इतका झाला आहे.
5. गुजरात
गुजरातमध्ये मंगळवारी 8 हजार 338 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर दिलासादायक म्हणजे 16 हजार 629 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासात 38 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात 6 हजार 679 रुग्णांनी नोंद करण्यात आली होती. तर 35 जणांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये आतापर्यंत 11.68 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 10 हजार 511 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 8.18% इतका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.