आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update : Modi Govt Exempts Customs Duty, Cess On Ventilators, Masks, Corona Test Kits

कोरोना दरम्यान दिलासा:सरकारने व्हेंटिलेटर, कोरोना टेस्टिंग किट आणि मास्कवरील एक्साइज ड्यूटी 30 सप्टेंबरपर्यंत हटवली, किमती होणार कमी

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोना संक्रमणासह व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग किटची मागणी वाढली आहे. - Divya Marathi
कोरोना संक्रमणासह व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग किटची मागणी वाढली आहे.
  • कोरोनावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा कमी न होण्याचा सरकारचा प्रयत्न
  • व्हेंटिलेटर आणि इतर सामानांवर मेडिकल सेस देखील लागणार नाही, 30 सप्टेंबरपर्यंत दिली सूट

कोरोना संकटादरम्यान केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्राने व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट आणि मास्कचे उत्पादन शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह या उपकरणांवर वैद्यकीय उपकरांसाठीही सूट देण्यात आली आहे. यामुळे या महामारीच्या संकटादरम्यान देशात व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग कीटचा पुरेसा पुरवठा राहिल. सोबतच वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) किट आणि सर्वप्रकारच्या मास्कच्या किंमतीत घट होईल.  कोरोना साथीच्या वेळी व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे महसूल विभागाने गुरुवारी सांगितले. अशा परिस्थितीत सरकार त्यांच्या आयातीवरील शुल्क आणि उपकर तातडीने मागे घेत आहे. तसेच, ही सवलत त्यांना देशात तयार करण्यावर कायम राहील. सद्यस्थितीत सरकारने ही सूट 30 सप्टेंबरपर्यंत निश्चित केला आहे.

आता किती शुल्क भरावे लागते?
सध्या व्हेंटिलेटर आणि टेस्टिंग किटवर 10%, मास्कवर 7.5%, पीपीई किटवर 7.5 ते 10% उत्पादन शुल्क घेतले जात होते. याशिवाय या व्यतिरिक्त या सर्व गोष्टींवर 5% वैद्यकीय उपकर स्वतंत्रपणे आकारण्यात येत होता. 

चीन जगभरात कोरोना किटची सर्वाधिक निर्यात करणारा देश
कोरोना संसर्गाच्या वाढीसह, स्थानिक बाजारात या उपकरणांची मागणी वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या उपचारांशी संबंधित किटची  उपलब्धता देशात राहावी यासाठी भारताने यांच्या निर्यातीवर यापूर्वीच बंदी घातली आहे. उत्पादन शुल्क व उपकर हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे व्यापारी तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. चीन जगभरात व्हेंटिलेटर, कोरोना किट आणि मास्कची निर्यात करणारा मोठा देश आहे.

बातम्या आणखी आहेत...