आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन गाइडलाइन:17 दिवसांत संपेल होम आयसोलेशन; पण 10 दिवसांत एकदाही ताप असू नये, दर 8 तासांनी मास्क बदलणे बंधनकारक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अत्यंत सौम्य लक्षणे किंवा पूर्व-लक्षणे असणार्‍या रुग्णांनाच घरी आयसोलेट होता येईल

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचे अति सौम्य लक्षणे किंवा प्री-सिम्पटोमॅटिक रुग्णांसाठी होम आयसोलेशनच्या गाइडलाइन्समध्ये बदल केले आहेत. होम आयसोलेशनवाले रुग्ण सुरुवातीचे लक्षण दिसल्याच्या 17 दिवसांनंतर आयसोलेशन संपवू शकतात. प्री-सिम्पटोमॅटिक प्रकरणांमध्ये  नमुना घेण्याच्या दिवसापासून 17 दिवस मोजले जातील. दोन्ही प्रकरणांमध्ये एक अट आहे, ती म्हणजे रुग्णाला 10 दिवसांपासून ताप नसावा. यापूर्वी, 27 एप्रिल रोजी, आरोग्य मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी करत अति सौम्य किंवा प्री सिम्पटोमॅटिक रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली होती. 

मंत्रालयाने आता होम आयसोलेशन असलेले रुग्ण आणि त्यांच्या काळजीवाहकांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये दोघांनाही ट्रिपल लेयर मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. 

रुग्णांसाठी 10 गाइडलाइन्स

1. नेहमी ट्रिपल लेयर मेडिकल मास्क घालणे आणि दर तासाला बदलणे बंधनकारक आहे. मास्क ओला किंवा घाण झाल्यास तात्काळ बदलावा.

2. वापरानंतर मास्कला 1% सोडियम हायपो-क्लोराइटसह निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

3. रुग्णाला आपल्या खोलीतच रहावे लागेल. घरातील इतर सदस्यांशी, विशेषत: वृद्ध आणि उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराचा आजार असलेल्यांशी कोणताही संपर्क साधू नये.

4. रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी आणि शक्य तितके पाणी किंवा द्रव पदार्थाचे सेवन करावे. 

5. श्वसन स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.

6. साबण-पाणी किंवा अल्कोहोल असलेल्या सेनिटायझरसह कमीतकमी 40 सेकंदांपर्यंत हात स्वच्छ केले पाहिजेत.

7. वैयक्तिक गोष्टी इतरांशी शेअर केल्या जाऊ नयेत.

8. खोलीतील ज्या गोष्टींना वारंवार स्पर्श करण्याची आवश्यकता असते (उदा. टेबलटॉप, दरवाजाच्या कडी आणि हँडल्स) यांना 1% हायपोक्लोराइट द्रावणाने साफ करावे.

9. रुग्णाला डॉक्टरांच्या सूचना आणि औषधांचे पालन करावे लागेल.

10. रुग्ण स्वत: च्या प्रकृतीचे स्वतः परीक्षण करावे. दररोज शरीराचे तापमान तपासावे. जर परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दर्शवित असेल तर ती त्वरित सांगावी. 

रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी 12 सूचना

1. रुग्णाच्या खोलीत जाताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क परिधान करावा लागेल. मास्क ओला किंवा घाण झाल्यास तत्काळ बदलावा. वापरल्यानंतर मास्क टाकून द्या आणि हात पूर्णपणे स्वच्छ करा.

2. काळजी घेणाऱ्याने आपला चेहरा, नाक किंवा तोंडाला स्पर्श करु नये.

3. रुग्णाच्या किंवा त्याच्या खोलीच्या संपर्कात आल्यावर हात चांगले धुवावेत.

4. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर, जेवण्यापूर्वी, शौचालयाला गेल्यानंतर आणि जेव्हा हात गलिच्छ वाटतात तेव्हा त्यास चांगले धुवावे. 40 सेकंद साबण-पाण्याने हात धुवा. जर हाताला धूळ लागली नसेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स देखील वापरु शकतात. 

5. साबणाच्या पाण्याने हात धुल्यानंतर डिस्पोजेबल कागद रुमालने पुसला पाहिजे. पेपर नॅपकिन नसल्यास, स्वच्छ टॉवेल्सने हात पुसा. ओले झाल्यावर ते बदला.

6. रुग्णाच्या शरीरातून सोडलेल्या द्रवपदार्थाच्या थेट संपर्कात येऊ नका. रुग्णाला हाताळताना हँड ग्लोज वापरा. ग्लव्ज परिधान करण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

7. रूग्णाची भांडी, पाणी, टॉवेल्स आणि चादरी यांच्या संपर्कात येऊ नका. 

8. रुग्णाला त्याच्या खोलीतच जेवण द्या.

9. रुग्णाची भांडी ग्लव्ज घालून साबणाने किंवा डिटर्जंटने स्वच्छ करा. ग्लव्ज काढल्यानंतर हात स्वच्छ करा. 

10. रुग्णाची खोली साफ करताना कपडे किंवा चादरी धुताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क आणि डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज वापरा. ग्लव्स घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

11. रुग्ण वेळेवर औषधी घेईल याची काळजी घ्या. 

12. काळजीवाहू किंवा रूग्णाच्या निकट संपर्कात असणा-यांनी स्वत: च्या आरोग्यावर लक्ष ठेवले पाहिजे. दररोज शरीराचे तापमान तपासा. कोरोनाशी संबंधित काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

बातम्या आणखी आहेत...