आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट:ओडिशा राज्याने 30 एप्रिलपर्यंत वाढवला लॉकडाउन, मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली माहिती; असे करणारे पहिले राज्य

भुवनेश्वर3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओडिशा पोलिस लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आहेत. राज्यात सध्या 42 संसर्गग्रस्त आहेत. - Divya Marathi
ओडिशा पोलिस लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आहेत. राज्यात सध्या 42 संसर्गग्रस्त आहेत.
  • रेल्वे आणि विमानसेवा सुरू करू नका, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे केंद्र सरकारला आवाहन

ओडिशामध्ये लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. लॉकडाउन वाढवणारे ओडिशा पहिले राज्य ठरले आहे. ओडिशात शाळा-महाविद्यालये 17 जूनपर्यंत बंद राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशभरात 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. आतापर्यंत पाच राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे सांगितले होते, परंतु अद्याप ही अंमलबजावणी झालेली नाही. मंत्रीगटाच्या उच्चस्तरीय बैठकीतही त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

पंतप्रधानांनी लॉकडाऊनबाबत खासदारांशी केली चर्चा 
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी पक्षांच्या 16 खासदारांशी झालेल्या बैठकीत या लॉकडाऊनवर चर्चा केली होती. अनेक राज्य सरकारे आणि तज्ञांनीही लॉकडाउनची मुदत वाढवण्याबाबत सल्ला दिल्याचे मोदी खासदारांना म्हणाले. यानंतर लॉकडाउन एकदाज संपवणार नसल्याचे पीएम मोदींची स्पष्ट केल्याचा दावा बीजद खासदार पिनाकी मिश्रा यांनी केला. तर  काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही सांगितले की, सरकार 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवू शकेल.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाउनवर चर्चा झाली
कोरोनावर झालेल्या गठीत मंत्र्यांच्या गटाच्या पहिल्या बैठकीतही या लॉकडाऊनवर चर्चा झाली. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 7 एप्रिल रोजी ही बैठक पार पडली होती. यावेळी गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. यानंतर मंत्रिमंडळाने शाळा-महाविद्यालये, मॉल आणि धार्मिकस्थळे 15 मे पर्यंत बंद ठेवण्याची शिफारस केली होती. 

बातम्या आणखी आहेत...