आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होत. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी भारतातील लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले.
काय म्हणाले मोदी ?
नमस्ते माझ्या प्रिय देशवासियांनो
कोरोना जागतिक महामारीच्या विरोधात भारताची लढाई फार मजबुतीने पुढे जात आहे. तुमच्या सर्व देशातील नागरिकांची तपस्या आणि तुमच्या त्यागामुळे भारताचं कोरोनामुळे फार कमी नुकसान झाले आहे.
तुम्ही सर्वांना अनेक त्रासाचा सामना करुन देशाला वाचवलं आहे. आपल्या भारताला वाचवलं आहे.
मला माहिती आहे तुम्हाला फार अडचणींचा सामना करावा लागला आहे. काहींना खाण्याचे कोणला येण्या-जाण्याची, काही जण त्यांच्या कुटुंबापासून दूर आहे. पण तुम्ही देशासाठी एक लढवय्या सैनिकाप्रमाणे तुमचं कर्तव्य करत आहे. त्याबद्दल मी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.