आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update : Runs Special Trains And Bus For Migrant Labour, Students In India

मजुरांसाठी विशेष रेल्वे:लॉकडाउन दरम्यान प्रथमच 9 राज्यांतील 11 शहरादरम्यान 7 विशेष रेल्वे गाड्या, सात हजार लोक आणि कामगार त्यांच्या घरी परतत आहेत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
श्रम एक्स्प्रेस केरळच्या एर्नाकुलम ते ओडिशाच्या भुवनेश्वरपर्यंत चालविण्यात आली आहे. - Divya Marathi
श्रम एक्स्प्रेस केरळच्या एर्नाकुलम ते ओडिशाच्या भुवनेश्वरपर्यंत चालविण्यात आली आहे.
  • रेल्वे गाड्यांसाठी गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे

लॉकडाउन दरम्यान इतर राज्यांत अडलेले मजुर, विद्यार्थी आणि अन्य लोकांसाठी 7 स्पेशल रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. याद्वारे जवळपास 7 हजार प्रवासी प्रवास करतील. काही रेल्वे आपल्या मुक्कामी ठिकाणी पोहोचल्या आहेत तर काही मार्गावर आहेत. मजुरांसाठीची पहिली रेल्वे तेलंगाणाच्या लिंगमपल्ली येथून झारखंडच्या हटियापर्यंत धावली. रात्री उशिरा ही रेल्वे हटियात दाखल झाली. याचप्रमाणे नाशिक (महाराष्ट्र) ते भोपाळ (मध्य प्रदेश) रेल्वे शनिवारी सकाळी भोपाळला पोहोचली. 

केरळमधील एर्नाकुलम ते ओडिशामधील भुवनेश्वरपर्यंतर रेल्वे धावत आहे. यामध्ये 1200 लोक असून त्यातील बहुतेक मजुर आणि त्यांचे कुटुंबे आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिकहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे धावली. यामध्ये 839 प्रवासी आहेत. त

रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी कामगारांची तपासणी करुन घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी

या गाड्या चालविण्याबाबत गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन केले जात आहे. कोचमध्ये प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसवले जात आहे. निघालेल्या आणि पोहोचलेल्या संबंधित स्टेशनवर येताच त्यांची तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. स्थानिक जिल्ह्यात 14 दिवसांच्या क्वारंटाइन नंतरच त्यांना घरी पाठविले जाईल. लोकांना पाठवणाऱ्या आणि बोलावणाऱ्या राज्य सरकारांच्या विनंतीनुसारच या विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. दरम्यान ही रेल्वे कुठेही थांबणार नाही. रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी कामगारांची तपासणी करुन घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. लक्षणे नसणाऱ्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. 

महाराष्ट्र : कोट्याहून पुण्यात पोहोचले विद्यार्थी 

कोटा येथून 74 विद्यार्थ्यांना घेऊन रात्री 12 वाजता दोन बस पुण्याला पोहोचल्या. या सर्वांना स्वारगेट बस स्टँडवर उतरवण्यात आले आणि स्क्रिनिंग केली गेी. यानंतर विद्यार्थ्यांना होम क्वारंटाइनसाठी शिक्का लावण्यात आला.  

बातम्या आणखी आहेत...