आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पायांवर दिसणारा जांभळ्याची रंगाची जखम कोरोना संक्रमणाचे लक्षण देखील असू शकते असा दावा इटली आणि स्पेनच्या तज्ज्ञांनी केला आहे. या दोन्ही देशांमध्ये, अंगठ्यांना खोल जखमा झालेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही लक्षणे विशेषत: मुले आणि किशोरवयीनांमध्ये पाहिली गेली. जगभरात कोरोनाव्हायरस संसर्गाची व्याप्ती जितक्या वेगाने वाढत आहे, तितकेच त्याची लक्षणे देखील बदलत आहेत. जगभरातील देशांमध्ये केलेल्या संशोधनानुसार गेल्या 4 महिन्यांत कोरोनाची 15 पेक्षा अधिक नवीन लक्षणे दिसली आहेत.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे ताप, स्नायूंचा त्रास आणि श्वास घेताना त्रास होणे यांसारख्या कोरोनाची सामान्य लक्षणे दर्शवित नसलेले प्रकरणे वाढत आहेत. संक्रमणाच्या सुरुवातीला असे बदल दिसत आहेत ज्यामुळे लोक संक्रमणाचा इशार समजू शकत नाहीत. जसे की, गंध न येणे, डोकेदुखी, बोलताना शुद्ध हरपणे, पोटदुखी आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार होणे. तज्ञांकडून जाणून घ्या, संसर्गाची कोणती लक्षणे दिसल्यावर सतर्क राहावे.
कोरोना भयावहता दाखवणाऱ्या 4 घटना
केस - 1: सुरुवातीला पायात गडद रंगाची जखम नंतर खाज सुटणे
इटलीत कोरोना संक्रमणाची सुरुवातीला 13 वर्षीय मुलाचे प्रकरण समोर आले. त्याच्या पायाला गडद रंगाची जखम होती. जखम मोठी झाल्यानंतर त्याला 8 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनंतर ताप, डोकेदुखी, शरीरावर खाज सुटणे, जखमेत जळजळ, स्नायूंमध्ये वेदना यांसारखी लक्षणे दिसली. इटलीमध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण उघडकीस आल्यानंतर 5 आठवड्यांनंतर एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात म्हटले आहे की रुग्णालयात प्रत्येक पाच पैकी एका मुलाच्या त्वचेवर वेगवेगळे बदल दिसून येत आहेत.
बाल रोग महाविद्यालयाच्या स्पॅनिश जनरल कौन्सिलमध्ये 7500 व्यावसायिक आहेत. त्यांनी असा डेटा तयार केला, ज्यामध्ये अशी मुले होती ज्यांच्या पायाजवळ जखमा होत्या. याचा अभ्यास केला गेला. काउंसिलच्या अहवालात समोर आले की, इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
केस 2 : अन्न विषबाधेतून संक्रमणाचा इशारा
चीनमधील आकडेवारीनुसार, 50 टक्के कोरोना रुग्णांना ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे आणि डायरिया सारखी लक्षणे आढळली. अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोनामधील 204 रुग्णांवर केलेल्या संशोधनात याची पुष्टी झाली आहे. लंडनच्या बाल्हॅममध्ये राहणारी इस्ला हस्लमने ‘द सन’ च्या अहवालात आपला अनुभव शेअर केला आहे.
केस-3 : दक्षिण कोरियामध्ये गंध आणि चव न समजणे सुरुवातीचे लक्षण
गंध किंवा सुवास न घेता येणे आणि चव न समजणे देखील कोरोना संक्रमणाचे प्रारंभीचे लक्षण आहे. ब्रिटीश रिनोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष निर्मल कुमार यांच्या मते, दक्षिण कोरिया, चीन आणि इटलीमधील कोरोना पीडितांमध्ये याची पुष्टी झाली आहे. संशोधन अहवालानुसार दक्षिण कोरियामध्ये कोरोना पीडित 30 टक्के लोकांना गंध न घेता येणे हे सर्वात महत्वाचे लक्षण होते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होण्याशिवाय हे देखील एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे, जे संसर्ग ओळखण्यास उपयुक्त ठरू शकते. अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑटोलॅरिंगोलॉजी तर्फे नुकताच असाच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अमेरिकन अकॅडमीच्या अहवालानुसार अशी लक्षणे दिसू लागल्यास विलंब न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
केस-4 : रुग्ण बोलता-बोलता शुद्ध हरपला आणि नाव सुद्धा सांगू शकला नाही
अमेरिकेच्या मिशिगनमध्ये 50 वर्षीय विमानसेवा महिला कामगाराला कोरोनाची लागण झाली. तिला काय होत आहेत याबाबत काहीच समजत नव्हते, तिने डॉक्टरांना डोकेदुखीचे कारण सांगितले. मुश्किलिने ती डॉक्टरांना आपले सांगू शकली. स्कॅनिंग केल्यानंतर महिलेच्या मेंदूत सूज असल्याचे निदर्शनास आले. मेंदूच्या एका भागाच्या काही पेशी खराब झाल्या होत्या. इटलीच्या ब्रॅसिका विद्यापीठाच्या हॉस्पिटलशी संबंधित डॉ. अलेस्सॅन्ड्रो पेडोवानी यांच्या म्हणण्यानुसार, इटली आणि जगाच्या इतर भागांतील डॉक्टरांनी कोरोनाच्या रूग्णांमध्येही असेच बदल पाहिले. काही प्रकरणांमध्ये ताप आणि श्वास घेण्यास अडचण यासारखी लक्षणे दिसण्यापूर्वीच कोरोनाचा रुग्ण बेशुद्ध होतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.