आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update : Trump Thanked India For Lifting Ban On Hydroxychloroquine Modi Said India Do Everything Possible To Help Humanity Fight Against COVID 19

कोरोनावर भारत-अमेरिका:हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी उठवल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताचे मानले आभार, पीएम मोदींनी दिले असे उत्तर

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधावरून ट्रम्प यांनी 7 एप्रिल रोजी भारताला धमकी वजा इशारा दिला होता

कोरोनाशी सामना करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील निर्बंध हटवल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभारा मानले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, ''कठीण प्रसंग मित्रांना जवळ आणतात. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे अध्यक्ष ट्रम्प. भारत-अमेरिका संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत. भारत कोरोनाविरूद्धच्या लढाईत मानवतेसाठी जे काही शक्य असेल ते करेल. आपल्याला एकजुटीने कोरोनावर विजय मिळवायचा आहे.''    ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट केले होते की, "कठीण प्रसंगी मित्रांमध्ये दृढ संबंध असणे आवश्यक आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर निर्णय घेतल्याबद्दल मी भारताचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, या लढाईत तुमच्या नेतृत्त्वाबद्दल केवळ भारतच नव्हे तर मानवतेला मदत केल्याबद्दल तुमचे आभार मानतो." राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 एप्रिल रोजी भारताला धमकी वजा इशारा दिला होता. आमच्या आग्रहानंतर भारताने औषधी दिली नाही तर कारवाई करू असे ते म्हणाले होते. ट्रम्प यांच्या धमकी वजा इशाऱ्याच्या दोन तासांनंतर भारताने आपल्या गरजा लक्षात घेऊन हे औषध इतर देशांमध्ये पाठविण्याची घोषणा केली होती. शनिवारी ट्रम्प यांनी भारताला हायड्रोक्सीक्लोरोक्विन पुरवठा करण्याची विनंती केली.

भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर बंदी घातली होती 

सरकारने 25 मार्च रोजी देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी आणण्याची घोषणा केली होती. कोरोना संसर्गामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याने सरकारने ही बंदी देशात लागू केली होती, जेणेकरून देशात आवश्यक औषधाची कमतरता भासू नये. मंगळवारी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की मानवतावादाच्या आधारे सरकारने निर्णय घेतला की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि पॅरासिटामोल देखील मदत मागणार्‍या शेजारच्या देशांना पाठविण्यात येईल.

काय आहे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन?
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे भारतातील मलेरियाच्या उपचारांसाठी एक जुने आणि स्वस्त औषध आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या दरम्यान या औषधाचा अँटी-व्हायरल म्हणून वापर केला जात आहे. भारत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी औषध असल्याचा ठाम पुरावा नाही. चीनच्या झेजियांग युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेणारी व्यक्ती कोरोनाशी जास्त काळ लढू शकते.

बातम्या आणखी आहेत...