आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Update | Uddhav Told The People Cooperate With The Government So That There Is No Lockdown Again; CM Of Telangana Said We Will Take A Decision On Lockdown Soon

राज्यांमध्ये कोरोना:सरकारला सहकार्य करा जेणेकरून पुन्हा लॉकडाऊन होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस, संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यास नकार देऊ शकत नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्यावर विचार सुरू केला आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशानंतर आता महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करत ट्वीट केले की, "लॉकडाउन पुन्हा लागू न करण्यासाठी जनतेने सरकारला सहकार्य करावे." दुसरीकडे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी म्हटले की, दोन ते तीन दिवसांत आम्ही राज्यात होणाऱ्या संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेऊ. यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल. 

अत्यंत महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडा: मुख्यमंत्री ठाकरे 

उद्धव ठाकरेंनी लिहिले की, "मी लॉकडाउन लागू करत नाही याचा अर्थ असा नाही की, तुम्ही निष्काळजीपणाने वागावे. परंतु यावेळी आपण सर्वांनी अधिक शिस्तबद्ध व्हायला हवे. आपल्या ज्येष्ठ व्यक्तींची आणि मुलांची काळजी घ्यावी लागेल. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहे पडा. तरुणांनीही सावध असणे आवश्यक आहे."

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी स्थानिक लोकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या घरापासून दोन किलोमीटरच्या आतच बाहेर पडावे. आवश्यक वस्तू घेण्यासाठी अथवा सलूनला जायचे असल्यास दोन किलोमीटरच्या आतच रहा. दरम्यान नोकरवर्गांसाठी यामध्ये सूट देण्यात येणार आहे.  

वरिष्ठ डॉक्टरांनी कामावर परतावे,  उद्धव ठाकरेंची विनंती

उद्धव ठाकरेंनी ट्वीटमध्ये वरिष्ठ डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. "अनेक वरिष्ठ डॉक्टर्स ज्यांचे वय 50-60 किंवा त्यापेक्षा अधिक आहेत ते रुग्णालयात येत नसल्याचे मला समजले. अशा डॉक्टरांना मी आश्वस्त करतो की, आता आपल्याकडे पीपीई कीट आणि एन-95 मास्कची कमतरता नाही. मोठ्या संख्येने रूग्ण तुमच्यावर विश्वास ठेवतात. यावेळी महाराष्ट्र आणि येथील लोकांना तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे."

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल : केसीआर

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील वेगाने वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील कोरोनाचा प्रसाराबाबत आढावा घेतला जाईल. आमची एक टीम यावर नजर ठेवेल. यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. 

कर्नाटकातील खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली 

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे की रुग्णालये कोणत्याही संक्रमित रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊ शकत नाहीत. जर असे करतांना पकडले गेले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...