आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाविरुद्धच्या युद्ध आघाडीवर मंगळवारी देशाला दोन मोठ्या बातम्या कळल्या. पहिली, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ कोटीहून अधिक झाली. यासोबतच रिकव्हरी रेट ९६.३२% झाला. हा दर ४ लाखांहून अधिक रुग्ण असलेल्या जगातील सर्व ३४ देशांपेक्षा अधिक आहे. दुसरी बातमी कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची आहे. मंगळवारीच देशात मृत्यूंची संख्या दीड लाखाहून अधिक झाली. आतापर्यंत फक्त अमेरिका व ब्राझीलमध्ये भारताहून अधिक मृत्यू झाले आहेत.
भारतात प्रारंभी ५० हजार मृत्यू १५७ दिवसांत झाले होते. नंतरचे १ लाख मृत्यू होण्यास केवळ ४८ दिवस लागले. मात्र, ही संख्या दीड लाख होण्यास ९६ दिवस लागले. आता रोज सरासरी २४२ मृत्यू होताहेत. जूनमध्ये मृत्यूंची संख्या वेगाने वाढत होती तेव्हाची ही सरासरी होती. आता ही संख्या कमी होत आहे. दुसरीकडे, बिहार, दिल्ली, हरियाणासह १८ राज्यांत रिकव्हरी रेट ९७% हून अधिक झाला आहे. तर, आंध्र, ओडिशा, आसामसह १० राज्यांत सक्रिय रुग्ण १% हून कमी आहेत. पंजाबमध्ये अजूनही मृत्युदर देशात सर्वाधिक ३.२% कायम आहे. तर, केरळ, तेलंगण, राजस्थानसह १२ राज्यांत तो १% हून कमी झाला आहे. याची राष्ट्रीय सरासरी १.४५% कायम आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.