आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Updates : Vaccination As Well As Herd Immunity Will Save The Country From The Third Wave Of Infection

कोरोना ट्रेंड:लसीकरण तसेच हर्ड इम्युनिटी देशाला संसर्गाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवेल, देश सध्या धोक्याच्या चक्रापासून दूर असल्याचे सांगणाऱ्या 4 बाबी

नवी दिल्ली (पवनकुमार)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या लाटेतील पीकच्या सहा महिन्यांनी दुसरी लाट आली, दुसऱ्या लाटेचा पीक येऊन ४ महिने लोटले
  • आता ३६% लाेकसंख्येचा सिंगल डोस पूर्ण, ६५% लोकसंख्येमध्ये अँटिबॉडी, यामुळे धोका कमी

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा पुन्हा जोरात सुरू आहे. बहुतांश वैज्ञानिकांनुसार, सध्या तिसऱ्या लाटेची शंका नाही. काहींच्या मते ती ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. मात्र मागील ट्रेंड व बदललेली परिस्थिती तिसऱ्या लाटेचा धोका अत्यंत कमी असल्याचे संकेत देत आहे. वैज्ञानिक त्याची २ प्रमुख कारणे देताहेत. पहिले - देशाच्या ३६% लोकसंख्येला लसीचा पहिला डोस लागलेला आहे. पुढील २ महिन्यांत सिंगल डोस घेणाऱ्यांची संख्या ५०% वर जाऊ शकते.

दुसरे कारण - देशाच्या ६५% लोकसंख्येत अँटिबॉडी आढळली आहे. संसर्गानंतरच अँटिबॉडी तयार होते. त्याला हर्ड इम्युनिटी म्हटले जाते. म्हणजे, इतक्या मोठ्या लाेकसंख्येला पुन्हा संसर्गाचा धोका पुढील ६ महिन्यांपर्यंत अशक्यच आहे. कारण, शरीरात सरासरी ६ महिन्यांपर्यंत अँटिबॉडी टिकतात.

लस न घेतलेल्या व अँटिबाॅडीही नसलेल्या लोकांना आगामी दिवसांत अत्यंत सतर्क राहावे लागणार
देशात ४५.६१ कोटी लोकांना पहिला डोस, १३.२८ कोटींना दोन्ही डोस मिळालेले आहेत. ही लोकसंख्या आता कोरोनाच्या गंभीर संसर्गाच्या धोक्याबाहेर आहे. त्यांना संसर्ग झाला तरी अत्यंत कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल. दुसरीकडे, अँटिबॉडी असलेल्या लोकांनाही कमी धोका आहे. मात्र ज्यांनी लस घेतलेली नाही व अँटिबॉडीही नसलेल्या लोकांना सर्वाधिक संसर्गाचा धोका आहे.

मात्र... तिसरी लाट रोखण्यासाठी आताही सर्वात सावधगिरी हेच मोठे शस्त्र... म्हणजे, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदी. {प्रो. नरेंद्र अरोरा, चेअरमन, नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन

ज्यांनी अद्याप एकच डोस घेतला, तेही गंभीर संसर्गापासून वाचतील

केरळ, महाराष्ट्र, अासाम वगळता इतर सर्वच राज्यांत धोका कमी... कारण अँटिबॉडी जास्त आयसीएमआरच्या सीरो सर्व्हेत देशात ६५% लाेकसंख्येत अँटिबॉडी आढळली आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७९% अँटिबॉडी, राजस्थानात ७६.२%, बिहार ७५.९%, गुजरात ७५.३% व छत्तीसगडमध्ये ७४.६% लोकसंख्येत आहे. या हिशेबाने या राज्यांत ितसऱ्या लाटेचा धोका कमी आहे. दुसरीकडे, केरळात ४४.४%, अासामात ५०.३% व महाराष्ट्रात ५८% लोकसंख्येत अँटिबॉडी आढळली आहे. म्हणजे, या राज्यांत आतापर्यंत संसर्गापासून वाचलेल्या लोकांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. या राज्यांत लसीकरणाला वेग आला नाही तर संसर्गाचा धोका कायम राहणार आहे.

डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक म्हणाल्या, भारतात संसर्ग पसरण्याचा दर आता कमी डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन मंगळवारी म्हणाल्या ‘भारतात संसर्ग पसरण्याचा दर आता कमी वा मध्यम आहे. त्याला एंडेमिक, म्हणजे स्थानिक पातळी म्हणता येईल. तो एपिडेमिक, म्हणजे महामारीच्या पातळीपेक्षा वेगळा असतो.

1. देशात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या आता फक्त ३.१० लाख
पाच महिन्यांपूर्वी १९ मार्चला देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांपार गेली होती. आता ३ लाखांपेक्षा कमी होत असल्याचे दिसत आहे.
ही मार्च २०२० सारखी स्थिती

2. तसेच देशात सक्रिय रुग्णांची सरासरीही आता फक्त ०.९८%
म्हणजे, जशी स्थिती कोरोनाच्या प्रारंभिक टप्प्यात होती, तशीच ती आता आहे. मार्च २०२० नंतर देशात संसर्गाचा वेग वाढला हाेता.
ही मार्च २०२० सारखी स्थिती

3. देशात दर १,००० चाचण्यांत १९ रुग्णच आढळत आहेत
संसर्गाचा दर (साप्ताहिक) आता १.९% आहे, तो ६० दिवसांत सर्वात कमी. केरळ व ईशान्येकडील ४ राज्यांत दर १०% पेक्षा जास्त.
ही जून २०२१ सारखी स्थिती

4. कोरोनाला हरवणाऱ्यांचा दर ९७.७% टक्क्यांवर
२१ महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण ३.२५ कोटी रुग्ण नोंदवले. पैकी ३.१८ कोटी बरे झाले. ४.३५ लाख रुग्णांचा मृत्यू झाला.
ही मार्च २०२० सारखी स्थिती

बातम्या आणखी आहेत...