आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona | Uttar Pradesh | Magh Mela Up | Marathi News | Holy Bath Of 10 Lakh Devotees On Mauni Amavasya; Magh Mela Begins At Sangamnagari Prayagraj In Uttar Pradesh During Corona Period

कोरोना काळात जनसागर:मौनी अमावास्येला 10 लाख भाविकांचे पवित्र स्नान; कोरोनाकाळात उत्तर प्रदेशातील संगमनगरी प्रयागराजमध्ये माघ मेळा सुरू

प्रयागराजहून अशोक पांडेय4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात उत्तर प्रदेशातील संगमनगरी प्रयागराजमध्ये माघ मेळा सुरू आहे. या भागात कल्पवासींसाठी हजार टेंटची नगरी वसवण्यात आली आहे. १७ जानेवारीपासून येथील किनाऱ्यावरील वाळवंटात कल्पवासी मुक्कामी आहेत. या वेळी निमित्त होते मौनी अमावास्येचे. दाट धुक्यात मंगळवारी दुपारपर्यंत १० लाखांहून जास्त भाविकांनी त्रिवेणीवर पवित्र स्नान केले.

अलोट गर्दी पाहता पर्व संपेपर्यंत पुण्य स्नानासाठी १ कोटीवर भाविक येतील, असा अंदाज आयोजकांनी लावला आहे. सरकार व मेळा प्रशासनाने कोविडचा विचार करून मेळ्यासाठी काही नियमावली तयारी केली. परंतु गर्दी पाहता नियम बाजूलाच राहिले. प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात नाही. कारण १० फेब्रुवारीपासून राज्यात निवडणूक आहे. घाटावर स्नानासाठी निश्चित अंतर ठेवण्यात आले आहे. परंतु काही लोक सोडल्यास कोणीही नियम पाळताना दिसले नाही. मास्क लावणाऱ्यांची संख्याही कमी होती.

१३ पोलिस ठाणी, ४० चौक्या, ५ हजार जवान, ६ किमी लांब घाट

  • मेळ्यात सुरक्षा व्यवस्थेसाठी १३ पोलिस ठाणे, ४० चौक्या तयार केल्या आहेत. अस्थायी रुग्णालये सुरू करण्यात आली. ५ हजार जवान तैनात केले.
  • मेळ्याच्या ५ सेक्टरमध्ये ४ एसडीएमला दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले. त्यावर एडीएम स्तरचा अधिकारी आहे. ९ टेहळणी मनोऱ्यांवरून निगराणी केली जात आहे.
  • १६ प्रवेशद्वारांची संख्या २१ एवढी करण्यात आली. कोविडमुळे प्रत्येक प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाचे दहा लोक तैनात आहेत. येथे भाविकांची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे.

पुढचे पर्व वसंत पंचमीला : प्रयागराजचा माघ मेळा १४ जानेवारी मक्ररसंक्रांतीपासून १ मार्च महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. ४७ दिवसांत १६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमेपर्यंत एक महिन्याचा कल्पवास राहील. आता शेवटचे पर्व महाशिवरात्रीला असेल.

बातम्या आणखी आहेत...