आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळमर्यादा संपुष्टात आणली आहे. म्हणजे आता खासगी रुग्णालये कोणत्याही वेळेस लस देऊ शकतात. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, लस घेणाऱ्यास आक्षेप नसेल तर रुग्णालये सायंकाळी ५ वाजेनंतरही लस टोचू शकतात. लस घेणाऱ्यांची संख्या वाढली तर सरकारी रुग्णालयांतही दिवस-रात्री कोणत्याही वेळेस लसीकरण करण्याचा निर्णय घेण्याची मुभा राज्य सरकारांना असेल. लसीची टंचाई होऊ नये म्हणून राज्यांना ५ कोटी डोस पाठवले आहेत. आजवर १.४९ कोटी डोस टाेचले आहेत. म्हणजे राज्यांकडे यानी ३.५१ कोटी डोस शिल्लक आहेत. मंगळवारपासून देशातील २७ हजार केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. पैकी साडेबारा हजार केंद्रे खासगी रुग्णालयांनी उभारलेली आहेत.
कोविन अॅपसह कोविन पोर्टल वा रुग्णालयात जाऊन नोंदणी शक्य
एम्पाॅवर्ड ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशनचे चेअरमन आर.एस. शर्मा म्हणाले, कोविन 2.0 पोर्टलवर सोमवार ते मंगळवारी दुपारपर्यंत ५० लाखांवर लोकांनी नावनाेंदणी केली आहे. नोंदणीसाठी फोन वा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये selfregistration.cowin.gov.in टाइप करावे. यानंतर मोबाइल नंबरसह नाेंदणी प्रक्रिया सुरू होईल. जवळच्या रुग्णालयात जाऊनही लसीसाठी नोंदणी केली जाऊ शकते.
निवडणुकीत कोरोना ‘काही नाही’ म्हणणाऱ्या ट्रम्पनी गुपचूप घेतली लस
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने व्हाइट हाऊस सोडण्याआधी लस घेतली होती. ही बाब दोघांनी देशापासून लपवली होती, कारण निवडणुकीत ट्रम्प कोरोना ‘काही नाही’ असे सांगत हा कट आहे, असे म्हणत होते. ट्रम्प-मेलानिया यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच डोस घेतल्याचा दावा आहे.
एका डोसमुळेच रुग्णालयात भरती होण्याची शक्यता ८०% पर्यंत कमी होते
ब्रिटनच्या आरोग्य विभागाने लसीच्या परिणामावर डेटा विश्लेषण केले आहे. त्यानुसार, जे लोक एक डोस घेतल्यानंतर संक्रमित झाले, त्यांच्यापैकी बहुतांश लक्षणे नसलेले होते. महत्त्वाचे म्हणजे पहिला डोस घेतलेले लोक जेव्हा संक्रमित झाले तेव्हा सामान्य रुग्णांच्या तुलनेत ८०% पर्यंत कमी जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक म्हणाले की, लसीचा परिणाम चांगला आहे. मग ती फायझरची असो की ऑक्सफर्ड-अॅस्ट्रेझेनेकाची (कोविशील्ड). भारतातही कोविशील्डच सर्वाधिक दिली जात आहे.
मोठा धडा... ब्रिटनने सर्वात आधी सुरू केले लसीकरण, सर्वात वेगाने परिणामही तेथे; २ महिन्यांत नवे रुग्ण ६८ हजारांवरून घटून ८ हजार झाले
ब्रिटनमध्ये ५ जानेवारीनंतर दुसरा डोस देणे सुरू झाले. तोपर्यंत रोज एक लाखापेक्षाही कमी लोकांना डोस दिला जात होता. रोज आढळणारे रुग्णही सतत वाढत होते. ८ जानेवारीला सर्वाधिक ६८ हजार रुग्ण आढळले. नंतर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि नव्या रुग्णांत वेगाने घट सुरू झाली. आता रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ८ हजार झाली आहे, ती भारतापेक्षाही कमी आहे. पण, जेव्हा ब्रिटनमध्ये लस देण्यास सुरुवात झाली होती तेव्हा तिथे भारतापेक्षा तिप्पट जास्त रुग्ण आढळत होते. साडेसहा कोटी लोकसंख्येच्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत एकूण २.१ कोटी लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तथापि, सरकारने दुसऱ्या डोसचे आकडे अद्याप जारी केलेले नाहीत.
- ब्रिटनमध्ये ८ डिसेंबरला पहिला डोस, ५ जानेवारीपासून दुसरा डोस देणे सुरू झाले. ८ जानेवारीपासून रोज आढळणाऱ्या रुग्णांत वेगाने घट सुरू झाली, ती अजूनही सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.