आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशात कोरोना लसीच्या परिणामाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास केला आहे. लस घेतल्यानंतर संसर्ग झाल्याचे ८६% रुग्ण डेल्टामुळे आहेत, असा त्याचा निष्कर्ष आहे. म्हणजे डेल्टा व्हेरिएंट लसीपासून तयार अँटिबॉडीला चकवा देत आहे, हे स्पष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लस घेतलेल्या (एक किंवा दोन्ही डोस) लोकांना जर कोरोना होतही असला तरी त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज खूप कमी आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे लस घेतल्यानंतर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची सरासरी फक्त ०.४% आहे, जी लस घेण्याआधी १.३३% होती. भारतात २४.४% लोकसंख्येला एक डोस, ६.१% ला दोन्ही डोस दिले आहेत. लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोना झाला, त्यापैकी ६७७ रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. अभ्यासात सहभागी लोकांचे सरासरी वय ४५ वर्षे होते. तरीही फक्त ०.४% मृत्यू झाले. याउलट लस न घेता कोरोनाने मृत्यू पावलेले ६०% लोक ४० वर्षांवरील आहेत.
लसीच्या बळावर मृत्यू रोखण्यात ब्रिटन आघाडीवर; आधी १००० मध्ये ३५ रुग्णांचा मृत्यू, आता फक्त १ ब्रिटनमध्ये संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली आहे. तरीही तेथे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, ब्रिटनमध्ये ६७% लोकसंख्येला किमान एक डोस दिलेला आहे. लसीकरणाच्या बळावर ब्रिटनने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची सरासरी ३५ पटींपर्यंत कमी केली आहे. आता तेथे रोज सरासरी ३८ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी सरासरी ३८ लोकांचा मृत्यू होत आहे. म्हणजे १००० रुग्णांपैकी फक्त एकाचा मृत्यू होत आहे. पण डिसेंबर २०२० पर्यंत स्थिती त्याच्या उलट होती. तेव्हा १००० रुग्णांपैकी ३५ जणांचा मृत्यू होत होता. भारतासाठी ब्रिटनची ही स्थिती मोठे उदाहरण ठरू शकते. कारण भारत आणि ब्रिटनमध्ये ९५% पेक्षा जास्त नवे रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आढळत आहेत.
आशादायक बातमी मुलांसाठी लस लवकरच, चाचण्या पूर्ण झाल्या आहेत
केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाला सांगितले की, १२ वर्षांवरील मुलांसाठी लस लवकरच येईल. तिच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एका मुलाने हायकोर्टात लसीच्या मागणीबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने केंद्राकडून उत्तर मागितले होते. केंद्राने सांगितले की, मुलांना लस देण्याबाबत डीसीजीआय लवकरच निर्णय देतील.
३ प्रमुख निष्कर्ष
1. कोरोनाच्या लक्षणाच्या रुग्णांनाही रुग्णालयाची गरज खूप कमी पडली
लस घेतल्यानंतर ज्यांना लक्षणांसह कोरोना झाला, त्यापैकी फक्त ८.९% ना रुग्णालयात जावे लागले. सामान्यत : लक्षण असलेले सर्व रुग्ण भरती होतात.
2. डेल्टा अँटिबॉडीला चकवत आहे, पण गंभीर आजारी पाडत नाही
लस घेतल्यानंतर ज्यांना संसर्ग झाला, त्यांच्यापैकी ८६% जणांत डेल्टा व्हेरिएंट आढळला. पण त्यात गंभीर आजारी होणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.
3. लसीकरणानंतर मृत्युदर फक्त ०.४%, विना लसीकरण १.३३%डोसनंतर संक्रमित ६७७ लोकांपैकी तिघांचा (०.४%) मृत्यू. त्यांना आधीपासूनच गंभीर आजार होता. देशात कोरोनामुळे मृत्युदर १.३३% आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.