आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीकरणाचा दुसरा दिवस:पहिल्या दिवशी 1.91 लाख लोकांना लस दिली, केवळ 100 लोकांमध्ये साइड इफेक्ट, त्यापैकी 52 जण दिल्लीतील

नवीन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली होती. दरम्यान, 17 आणि 18 जानेवारी रोजी महाराष्ट्रात लसीकरण होणार नाही. त्याचबरोबर ओडिशामध्ये पहिल्या दिवशी लसीमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थींवर नजर ठेवण्यासाठी रविवारी ही लसी दिली गेली नव्हती.

दुसरीकडे या लसीचे दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहेत. पहिल्याच दिवशी दिल्लीत 52, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये 14-14, तेलंगाणात 11 आणि ओडिशात 3 जणांना लसीचे साइड इफेक्ट झाल्याचे समोर आले. शनिवारी एकूण 1.91 लाख लोकांना लस देण्यात आली, त्यापैकी 100 म्हणजेच केवळ 0.05% लोकांना साइड इफेक्ट्स झाल्याचे दिसून आले.

ही लक्षणे आढळून आली

वेदना

दर्द

चक्कर येणे

घाम येणे

छातीत जडपणा

सर्वाधिक लसीकरण करणारी 15 राज्ये

आंध्र प्रदेश16,963
बिहार16,401
उत्तर प्रदेश15,975
महाराष्ट्र15,727
कर्नाटक12,637
प. बंगाल9,578
राजस्थान9,279
ओडिसा8,675
गुजरात8,557
केरळ7,206
मध्यप्रदेश6,739
छत्तीसगड4,985
हरियाणा4,656
तेलंगणा3,600
तमिळनाडू2,728
बातम्या आणखी आहेत...