आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination For Children | Marathi News | Total Vaccination First Day Children| 37 Lakh 84 Thousand Children Between The Ages Of 15 To 18 Took The First Dose

मुलांचे लसीकरण:मुलांच्या लसीकरणाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद, 15 ते 18 वयोगटातील 37 लाख 84 हजार मुलांनी घेतला पहिला डोस

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात 37 लाख 84 हजार 212 मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालन्यासह राज्याच्या विविध भागात लसीकरण आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईत जवळपास नऊ लाख मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पुण्यात चाळीस तर पिंपरी चिंचवडमध्ये आठ लसीकरण केंद्रावर मुलांचे लसीकरण होत आहे. जालन्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लसीकरण पार पडले. तर नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मुलांचे लसीकरण अभियान पार पडत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

असे करा कोविन अॅप्सवर रजिस्ट्रेशन

  • सुरुवातील तुम्हाला कोविन हे अॅप्स घ्यावे लागणार आहे. त्यानंतर त्यात आपला मोबाइल क्रमांक टाका. OTP द्वारे त्याला लॉग इन करा.
  • आता आधार कार्ड, ड्रायविंग लायसेंस, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेंशन पासबुक, NPR स्मार्ट कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड यापैकी एक प्रूफ निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या आयडीचे नंबर त्यात टाका (उदा. आधार कार्डचे 12 अंक) त्यानंतर लिंग निवडा आणि आपला जन्म दिनांक प्रविष्ट करा.
  • त्यानंतर आपल्या परिसरातील पिन कोड टाका. आता तुम्हाला लसीकरण सेंटरची यादी आली असेल.
  • त्यानंतर तुम्हाला कोणत्या कंपनीची लस घ्यायची, केव्हा आणि कधी घ्यायची हे प्रविष्ट करा. त्यानंतर लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्या.
  • लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर आपल्याला एक रेफरेंस आयडी आणि सिक्रेट कोड द्यावा लागणार आहे. जो तुम्ही कोविन अॅप्सवर रजिस्ट्रेशन केल्यावर मिळतो.
बातम्या आणखी आहेत...