आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination: In India Vaccination Start From Today Above 45 Years; Vaccination News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून लस 45 प्लस!:45 वर्षांवरील सर्व लोकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लस देता येईल, योगायोग म्हणजे अशा लोकांची संख्या देशात 45 कोटींहून अधिक

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आता रोज 50 लाखांहून अधिक डोस देणे शक्य : सरकारचा दावा; इच्छुक लोक सकाळी 9 पासून कोविन पोर्टलवर नोंदणी करू शकतील

देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते. सध्या रोज दिलेल्या डोसची सरासरी २१ लाख आहे. ही संख्या ५० लाखांवर जाऊ शकते. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात ५० हजार केंद्रांवर एक दिवसात १०० ते २०० डोस देण्याची व्यवस्था आहे. हे लसीकरण वेगाने व्हावे म्हणून खासगी रुग्णालयांना सहभागी करून घ्या, असे राज्यांना सूचित करण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगडमध्ये ४०% हून अधिक डोस खासगी रुग्णालयांत दिले जात आहेत.

लस न घेणारे लोक आपले कुटुंबीय, समाजासाठी कायम धोकादायक ठरतील
-मी ४५ वर्षांवरील आहे. लस घेण्यासाठी काय करावे लागेल?

cowin.gov.in वर नोंदणी करा. लसीकरण केंद्राचा पर्याय निवडा. ऑनलाइन नोंदणी करू शकत नसाल तर केंद्रावर जा. नोंदणी करा.
-लसीकरण केंद्रावर आरोग्यविषयक कागदपत्रे दाखवावी लागतील?
अजिबात नाही.
-कोणते ओळखपत्र ग्राह्य असेल?
कोणतेही फोटो आयडी कार्ड. उदा. आधार, पॅन, मतदान ओळखपत्र.
-मी नोकरदार. दिवसभर काम असते. डोसनंतर विश्रांती घ्यावी लागेल?
विश्रांतीची गरज नाही. परंतु, लस घेतल्यावर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी ताप आलाच तर तापावर गुणकारी औषधे घेऊ शकता.
-लसीचे साइड इफेक्ट कोणते?
दंडावर सूज येऊ शकते. तापही येऊ शकतो. हे सामान्य परिणाम आहेत.
-खाण्यापिण्याचे पथ्य काय?
फक्त एकच लक्षात ठेवा, लस घेताना पोट रिकामे नसले पाहिजे.
-लस घेतल्यावर व्यायाम किंवा जॉगिंग करू शकतो का?
नियमित दिनचर्येत बदल करू नका. मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित औषधे चालू असतील तर ती घेणे चालू ठेवा.
-गर्भवती महिलांना लस देता येईल?
लस घेतल्यानंतर तीन महिने तरी गर्भधारणा होऊ देऊ नये.
-लसीचा पहिला व दुसरा डोस यात नेमके किती अंतर ठेवणे चांगले आहे?
दोन प्रकारच्या लसी आहेत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन. कोविशील्डचा दुसरा डाेस ६ ते ८ आठवड्यांत घ्यायला हवा. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी अँटिबॉडी तयार होतात. कोव्हॅक्सिन डोस ४ ते ६ आठवड्यांनी घ्यावा.
-कोणती लस घ्यावी याची निवड मी स्वत: करू शकतो का?
कोणत्या केंद्रावर कोणती लस आहे हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हवी ती लस असलेले केंद्र निवडू शकता. दाेन्ही लसी चांगल्या आहेत.
-लस घेतल्यानंतर मास्क आणि सुरक्षित अंतर किती दिवस पाळणे गरजेचे आहे?
जोवर सरकार देश कोरोनामुक्त घोषित करत नाही तोवर... जे सध्या तरी शक्य नाही. म्हणून मास्क आणि अंतर राखणे सोडणे म्हणजे कोरोनाला निमंत्रणच.
-कोरोना झालेल्यांनीही लसीचा डोस घ्यायला हवा का?
होय, डोसमुळे शरीरात अँटिबॉडी प्रोटीन वाढतात. दुसरा फायदा म्हणजे लस घेतल्यावर संसर्ग झाला तरी गंभीर आजारी पडण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होऊन जाते.
-जादा सर्दी आहे आिण थोडा तापही आहे. या स्थितीत लस घेऊ शकतो का?
चाचणी निगेटिव्ह असेल तर डोस घेऊ शकता. संसर्ग असेल तर मात्र डोस घेऊ नका. कोरोनातून बरे झाल्यानंतर ४-६ आठवड्यांनी लस घ्यायला हवी.
-लस अनिवार्य नाही, तर मी लस घ्यायची नाही असा निर्णय घेऊ शकतो का?
होय, तुम्ही ठरवू शकता. परंतु, असे करून तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि समाजासाठी कायम धोका ठराल.
(भारत सरकारच्या कोविड-१९ ग्रुपचे चेअरमन डॉ. नरेंद्र अरोरा यांनी अनिरुद्ध शर्मा यांना ही माहिती दिली.)

ब्रिटनमध्ये ४५ टक्के लोकांना लस दिल्याने रोजच्या रुग्णांची संख्या ६८ हजारांवरून ४ हजार
डोस सुरू झाले तेव्हा सध्या रोज एक डोस
रोजचे रुग्ण येणारे रुग्ण घेतलेले लोक
अमेरिका 3 लाख 61,240 29%
ब्रिटन 68,000 4,071 45%
इस्रायल 10,500 514 60%

शोधामुळे नव्या आशा पल्लवित
कोरोना प्रतिबंधक लस १२ वर्षांवरील मुलांसाठीही सुरक्षित : फायझरचा दावा
फायझरने म्हटले आहे की, त्यांची कोविड-१९ लस १२ वर्षांवरील मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी आहे. आतापर्यंत सर्व लसी १६ वर्षांवरील लोकांसाठी देण्यात येत आहेत. मॉडर्नानेही १२-१७ वर्षांच्या मुलांवर लसीच्या परिणामांचे प्रयोग सुरू केले आहेत.

लस यासाठी पण आवश्यक...
जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये ८ डिसेंबर २०२० रोजी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत तेथे रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ९४% कमी झाली. लसीकरणानंतर रुग्णसंख्या घटत असल्याचे जगातील हे सर्वोत्तम उदाहरण आहे. भारतात आतापर्यंत फक्त ३.८% लोकांना डोस दिले आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनुसार देशातील २० टक्के लोकसंख्येला लस दिली गेल्यानंतरच भारतात रुग्णांच्या संख्येत घट सुरू होणे शक्य आहे.

एकूण ४९ कोटी लोक लसीकरण अभियानात सहभागी होतील

  • आतापर्यंत १० काेटी ज्येष्ठ नागरिक, २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्स, १ कोटी आरोग्य कर्मचारी, ४५ वर्षांवरील गंभीर आजाराने ग्रस्त असलेले १ कोटी लोक लसीकरण अभियानात सहभागी होते. या १४ कोटींपैकी ५.३९ कोटी लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
  • आता ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या ३५ काेटी लोकांचाही यात सहभाग. म्हणजे एकूण ४९ कोटी लोक या लसीकरण अभियानात सहभागी होतील.
बातम्या आणखी आहेत...