आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination In January, 92.61 Lakh Health Workers Were Targeted 42.7% Completed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:जानेवारीत 92.61 लाख हेल्थवर्कर्सना डाेस देण्याचे लक्ष्य होते, 42.7% पूर्ण

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमध्ये मंगळवारी फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले. - Divya Marathi
पंजाबमध्ये मंगळवारी फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू झाले.
  • सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात एक तृतीयांश आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आतापर्यंत अपेक्षेपेक्षा निम्मा आहे. ३१ जानेवारीपर्यंत एकूण ३९.५ लाख हेल्थवर्कर्सना डोस देण्यात आले. हे उद्दिष्टाच्या ४२.७% आहे. ३१ जानेवारीपर्यंत सर्व ९२.६ लाख हेल्थवर्कर्सना तर फेब्रुवारी अखेरीस सर्व ३ कोटी जणांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

लसीकरणात मध्य प्रदेश ६९.४% डोस देऊन सर्वात आघाडीवर आहे. तेलंगण आणि राजस्थान अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब व महाराष्ट्रात हा वेग मंद आहे. आतापर्यंत ८ राज्यांत निम्म्याहून अधिक हेल्थवर्कर्सना डोस देण्यात आले आहेत. दुसरीकडे, ८ राज्यांत आतापर्यंत २० टक्के हेल्थवर्कर्सनाही डोस देण्यात आलेले नाहीत, असे चित्र आहे.

राज्यांत लसीकरण केंद्रे वाढवणार
पुढील दोन आठवड्यात लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट-तिप्पट करणार आहे. छत्तीसगडमध्ये सध्या २०० केंद्रे आहेत, बुधवारपासून ७०० केंद्रे असतील. झारखंडमध्ये १६० केंद्रे आहेत, दोन आठवड्यांत ३०० केली जातील. बिहारमध्ये ६८९ केंद्रे आहेत, ती १ हजार केली जातील. दुसरीकडे, १२ राज्यांत याच आठवड्यात फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण होईल.

हाच वेग राहिल्यास... फेब्रुवारीपर्यंत ३ कोटी डोसचे उद्दिष्ट शक्य नाही; रोज ९.६ लाख डोस द्यावे लागतील, सध्या सरासरी २.३२ लाख आहे.
भारतात १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाले होते. तेव्हा सांगितले की, फेब्रुवारीअखेरपर्यंत म्हणजे एकूण ४४ दिवसांत ३ कोटी डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी रोज ६.८२ लाख डोस देणे आवश्यक होते, आतापर्यंत रोजची सरासरी २.३२ लाख आहे. त्यामुळे फेब्रुवारीतच ३ कोटींचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर २७ दिवसांत (२ फेब्रुवारीचाही समावेश) रोज ९.६ लाख डोस द्यावे लागतील. म्हणजे रोज दिल्या जाणाऱ्या डोसची संख्या चौपट करावी लागेल.

६० देशांची भारताकडे लसीची मागणी, १७ देशांना ६४ लाख डोस दिले
गेल्या दोन महिन्यांत ६० देशांनी भारताकडे लसीची मागणी केली आहे. त्यापैकी १७ देशांना ३१ जानेवारीच्या सायंकाळपर्यंत ६४ लाख डोस पाठवण्यात आले होते. बांगलादेशला सर्वाधिक २० लाख, म्यानमारला १५ लाख आणि नेपाळला १० लाख डोस देण्यात आले आहेत.

चौथ्या स्थानासाठी आता स्पर्धा इस्रायलशी, या देशात भारतापेक्षा फक्त १० लाख डोस अधिक १७ नोव्हेंबर २०१९ रोजी चीनमध्ये जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळला. लसीकरण ८ डिसेंबर २०२० रोजी इंग्लंडमध्ये सुरू झाले. १६ जानेवारीला भारत लसीकरण सुरू करणारा ३१वा देश होता. आता सर्वाधिक डोस देणारा जगातील पाचवा देश.