आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Vaccination More Than 1.20 Crore People Do Not Take A Single Dose | Marathi News

लसीकरण:साठीवरील 1.20 कोटींपेक्षा जास्त लोकांना एकही डोस नाही, पावणेदोन कोटींनी घेतला नाही दुसरा डोस

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च-२०२१ पासून देशात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची सुरुवात झाली आहे. १० महिन्यांहून अधिक काळ गेल्यानंतर साडेआठ टक्क्यांहून जास्त ज्येष्ठांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही. जवळपास पावणेदोन कोटी ज्येष्ठांनी दुसरा डोस घेतला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानुसार, देशात एक कोटी २० लाख ८२ हजार ७९२ नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही. मात्र, काही राज्यांच्या म्हणण्यानुसार, यातील ज्येष्ठांची एक मोठी संख्या दुसऱ्या राज्यांत गेल्याची शक्यता आहे आणि त्या राज्यात जाऊन लस घेतली असावी. मात्र, याची ठोस माहिती राज्यांकडे उपलब्ध नाही. केंद्र सरकारने राज्यांकडून घेतलेल्या आकडेवारीला आधार मानल्यास एक कोटी २० लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

पावणेदोन कोटींनी घेतला नाही दुसरा डोस
तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त २६ लाखांपेक्षा जास्त, पश्चिम बंगालमध्ये १५ लाख, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वात जास्त ज्येष्ठांनी लस घेतली नाही. यापैकी केवळ राजस्थानने ज्येष्ठ अन्य राज्यांत गेले असावेत आणि तिथे त्यांनी लस घेतली असावी, असे सांगितले. मात्र, हे स्पष्ट नाही. देशात आतापर्यंत १७४ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस लागलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...